सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण !!
अलिबाग, प्रतिनिधी :- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01 जुलै 2023 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि.30 जून 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा मोबाईल व व्हॉट्सअप क्र. 9860254943 वर संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वत:च्या हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेवून दि.30 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाच्या दिवशी व्हॉट्सअप क्र. 9860254943 वर किंवा ftoalibag@rediffmail.com या ईमेल वर सादर करावेत.
अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड-अलिबाग, 102/103 समृध्दी को.ऑप.हौसिंग सोसायटी, घरत आळी, एसटी स्टँडजवळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सु.शं.बाबुलगावे यांनी केले आहे.
प्रशिक्षणांतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजिन असलेल्या “मत्स्यप्रबोधिनी” नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते.
त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे - प्रशिक्षण कालावधी 01 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2023 (6 महिने) आवश्यक पात्रता :- उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे, आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे आवश्यक, उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक, क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा, विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी, उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण शुल्क :- प्रति माह रु.450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.2700/- मात्र दारिद्रयरेषेखालील असल्यास प्रति माह रु.100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 600/- मात्र. दारिद्रयरेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा.
रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी :- राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येते. कस्टम विभाग, नेव्हल डॉक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, सागरी पोलीस, मत्स्य महाविद्यालय इ. विभागांच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते.
No comments:
Post a Comment