सिंक्रो डिजिटल मार्केटिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने सुखकर केला श्रीलोचनच्या मुलांचा शैक्षणिक आयुष्याचा प्रवास !!
मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
सिंक्रो डिजिटल कंपनीने आज श्रीलोचन बाल विकासकेंद्र, कात्रज येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात टाटा विंगर या गाडीची चावी संस्थेच्या पदाधिकारी श्रीमती प्रीती पांगे आणि श्री.विशाल महांगरे याना सुपूर्द केली. यावेळी सर्व मुलांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आणि धन्यवाद दिले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.दयानंद कुबल, प्रकल्प समन्वयक श्री.संदीप कोळी, कार्यकर्ता निकिता कंटाळे, संगीता वाळवी, साक्षी पोटे, सुवर्णा गायकवाड, सुरेखा खांडारे आदी उपस्थित होते.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था संचालित श्रीलोचन बालविकास केंद्र रस्त्यावरील मुले, सनाथ मुले, स्थलांतरित कामगारांची मुले, आदिवासी मुले, एकल पालक मुले यांच्यासाठी २०२१ ला सुरु केले असून येथील मुले शिक्षणासाठी आसपासच्या शाळेत जातात. वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे मुलांना कधी रिक्षातून तर कधी चालत पाठवावे लागत होते. या वाहतुकीच्या प्रवासातील धोके लक्षात घेता वाहतुकीचे चांगले साधन उपलब्ध करून दिल्यास मुलांचा प्रवास सुखकर होईल ह्या भावनेतून सिंक्रो डिजिटल या कंपनीने हि गाडी संस्थेला भेट दिली असल्याचे कंपनीचे श्री. रवी मोटवानी व श्री. कौस्तुभ पवार यांनी सांगितले.
हे वाहन आमच्या संस्थेला सिंक्रो डिजिटल यांच्या संपूर्ण आर्थिक सहकार्याने लाभले आहे. सिंक्रो डिजिटलने दिलेल्या या गाडी मुळे मुलांचा प्रवास सुरक्षित होईल, वेळेचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल, मुले वेळेत शाळेत पोचतील, साफ सफाई असल्या मुळे आरोग्य चांगले राहील, शैक्षणिक सहलीसाठी गाडी वापरता येईल, तसेच त्यांच्या दिवसातील २ तास वाचतील ज्यामुळे मुलांना अभ्यासासाठी जास्त वेळ मिळेल हे आणि असे बरेच फायदे या गाडी मुळे होणार आहेत.
सिंक्रो डिजिटलची ही संकल्पना साकारण्याकरीता श्री साकेत सिन्हा व श्री अक्षय तोडकर यांचे सहकार्य लाभले. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल हे कोकण संस्थेचे ब्रीद वाक्य आणि ध्येय पूर्ण करण्यास या गाडी मुळे मदत होईल असे म्हणत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. दयानंद कुबल यांनी आभार मानले तसेच आपण दिलेल्या गाडीचा विनियोग अनेक चांगल्या गोष्टींसाठी करू अशी खात्री त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला सिंक्रो डिजिटल कडून रवी मोटवानी, कौस्तुभ पवार, राहुल डोंगरे, अभिषेक बटवाल, धर्मिन शाह, अभिनंदन यादव, अतितकुमार शाह, हरीश सुब्रमण्य, राहुल अधिकारी, साकेत सिन्हा उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. विशाल महांगरे यांनी केले, सुत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती प्रीती पांगे यांनी तर आभार श्री.संदीप कोळी यांनी मांडले.
No comments:
Post a Comment