Wednesday, 9 August 2023

अखेर लाचखोर त्र्यंबकेश्वर तहसीलदार नरेशकुमार बहिरम निलंबित !

अखेर लाचखोर त्र्यंबकेश्वर तहसीलदार नरेशकुमार बहिरम निलंबित !

महसूल विभागाची मान शरमेने खाली -- महसूल मंत्री

  महसूल मंत्री मा. राधाकृष्ण  विखे पाटील  व लाचखोर नारेशकुमर बहिरम

भिवंडी, दिं,१०,अरुण पाटील (कोपर) :
         लाच प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले  त्र्यंबकेश्वर तहसीलदार नरेशकुमर बहिरम याला विभगिय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहे. राजूर बहुला तेथील मुरूम उत्खनना प्रकरणी संबंधित जमीन मालकाला बहिरम याने सव्वा कोटीची नोटीस पाठवली होती.
          या आदेशाविरुद्ध जमीन मालकाने उपविभागीय अधिकार्‍यांकडे अपील दाखल केले होते. त्यांनी हे प्रकरण फेर चौकशीसाठी पुन्हा बहिरम यांच्याकडे पाठविले. उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापरल्याचा जमीन मालकाचा दावा असल्याने स्थळ निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी बहिरम याने संबंधितांकडे तडजोडी अंती १५ लाखांची लाच मागितली होती.
           लाचखोर तहसीलदार बहिरम सारख्या अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण महसूल विभागाची मान शरमेने खाली गेली असून या घटनेचे मला अतिशय दुःख झाले असून चिडही आहे.अशा लाचखोर अधिकऱ्यांवर कारवाईसाठी व तक्रारी जाणून घेण्या करिता पोर्टल सुरू करण्याचा विचार आहे. ज्या द्वारे या पोर्टलवर सर्व तक्रारी एकत्रित करून अधिकाऱ्यांची चौकशी करने शक्य होईल या संदर्भात मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारा असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी सांगीतले.
            या प्रकरणात शनिवारी (दि. ५) रोजी नारेशकुमार बहिरम याला लाच घेताना पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ६ ऑगस्ट रोजी सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर तो सलग ४८ तास पोलिस कोठडीत असल्याने नियमानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बहिरम याने जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे या आदेशात म्हटले आहे.
            लाचखोर तहसीलदार बहिरम हा  'वर्क फ्रॉम होम'; करत असे. मलईदार फाईलींचा घरातूनच निपटारा करायचा. या प्रकरणामुळे लाचखोर बहिरमचा खाजगी चालकही चर्चेत आला असून त्याच्या नावे जमिनी, हॉटेल, बंगला आहे?
            लाचखोर बहिरमच्या घरात घबाड सापडले असून त्यात रोकड, सोने, चांदी 'असा' मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच लाचखोर बहिरमने धुळ्यात प्लॉट खरेदी केला असून पत्नीच्या नावे मोठी एफडी असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. गुडलक'साठी तहसीलदार यांनी आपल्या कार्यालयाची दिशा  बदलली होती. मात्र, बहिरम यांचीच दशा झल्याचे चित्र समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...