Wednesday, 9 August 2023

अनेक वर्ष शारीरिक संबंध ठेवल्यावर बलात्काराचा आरोप करत येणार नाही -- कर्नाटक उच्च न्यायालय.

अनेक वर्ष शारीरिक संबंध ठेवल्यावर बलात्काराचा आरोप करत येणार नाही -- कर्नाटक उच्च न्यायालय.

भिवंडी, दिं,९,अरुण पाटील (कोपर) :
         अनेक वर्षं सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानतंर अचानक बलात्काराचा आरोप करता येणार नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. याचिकाकर्ता महिलेसोबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर आरोपीचे संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर ते विभक्त झाले आणि याचिकाकर्त्या महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली.
          या महिलेची मैत्री २०१३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून आरोपीसोबत झाली. दोघंही एकाच परिसरात राहत होते. त्यामुळे आरोपीने आपण शेफ असल्याचं सांगून तिला दररोज आपल्या घरी न्यायला सुरुवात केली. तो अतिशय चविष्ट जेवण बनवत असे. त्यामुळे जेव्हा महिला त्याच्या घरी जात असे, ते दोघंही मद्यसेवन करत आणि त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होत होते. जवळपास सहा वर्षं त्यांच्यात संबंध होते. मग २७ डिसेंबर २०१९ पासून दोघांमध्ये बेबनाव झाला. त्यानंतर ८ मार्च २०२१ रोजी महिलेने बेंगळुरूच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि धमकीचे आरोप करून तक्रार दाखल केली. नंतर तिने आरोपीला जामीन मिळाल्याचं कळल्यानंतर त्याच्यावर मारहाण आणि बलात्काराचा आरोप केला.
          या प्रकरणाची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयात झाली. त्यावेळी न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांनी बेंगळुरूच्या इंदिरानगर तसंच दावणगेरे येथे आरोपी विरोधातील सर्व तक्रारी रद्द करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्ती महिला आणि आरोपी यांच्यात सहा वर्षांपर्यंत लैंगिक संबंध होते. त्यामुळे आरोपीवर बलात्काराचा आरोप करता येणार नाही. सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांतील स्वारस्य कमी झाल्याचा अर्थ असा नाही की त्याच्या आधारे बलात्काराचा आरोप केला जाऊ शकतो, असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...