Monday, 4 September 2023

वसईत विदेशी बनावटीच्या पिस्तूलासह आरोपीला अटक !!

वसईत विदेशी बनावटीच्या पिस्तूलासह आरोपीला अटक !!



वसई , प्रतिनिधी : वस‌ईत एका आरोपीकडून विदेशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास खैरपाडा, वसई परीसरात एकजण पिस्तूल खरेदी-विकीसाठी येणार असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. वालीव पोलीस ठाणे यांनी वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन सानप व पथकास त्याप्रमाणे आदेश दिले होते.

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने परीसरातून आरोपी रमेशकुमार सत्यप्रकाश यादव (वय 25) या मुळचा उत्तरप्रदेश येथील आरोपीला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक विदेशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीनसह 4 जिवंत काडतुसे आणि 1 रिकामी पुंगळी असा एकूण 54 हजार 500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा विनापरवाना पिस्तूल जवळ बाळगताना आढळला असून त्यांच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पौणिमा श्रींगी चौगुले, पोलीस उपायुक्त, परीमंडळ 2 चे विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सैय्यद जिलानी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. सचिन सानप, पो.ह. मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, सुनिल चव्हाण, कुटे, बालु पो.शि. विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी केली आहे.




No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...