झिगांट डान्स नंतर आता कसा-यातील 'बिर्याणी, पार्टी गाजणार? सीईओंकडे तक्रार ! सूचनां कडे केलेले दुर्लक्ष केंद्र प्रमुखास भोवणार?
कल्याण, (संजय कांबळे) : मागील फेब्रुवारी २०२३ मध्ये शहापूर तालुक्यातील शिक्षकांचा झिगांट डान्स महाराष्ट्र भर गाजला होता, या व्हायरल झालेल्या विडिओ वरुन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांनी या शिक्षकावर कारवाई देखील केली होती. हि घटना ताजी असतानाच कसारा विभागात केंद्र प्रमुखाने शिक्षण परिषदेत सीईओंच्या लिखित सूचनांना, निर्देशांना, बगल देत सहभागी शिक्षकांना 'बिर्याणी, ची मेजवानी दिली, त्यामुळे आता ही बिर्याणी पार्टी केंद्र प्रमुखाच्या चांगलीच अंगलटी येणार अशा शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत सर्व स्तरावर कार्यप्रेरित होऊन १०० टक्के मुले शिकण्याच्या उद्देशाने काम केल्याने राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील शिक्षण परिषदा लाभदायक ठरत आहेत, याकरिता महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शिक्षण परिषदा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांनी लिखित पत्र काढून या परिषदा कशा प्रकारे घ्यायला हव्या याबाबत सुमारे ११ सूचना केल्या आहेत, व या सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही निर्देश दिले आहेत
असे असताना शहापूर तालुक्यातील कसारा विभागात या परिषदांच्या मुळ उद्देशाला हरताळ पासण्याचा प्रकार उजेडात आला आहे. येथे केंद्र प्रमुख अशोक मोरे यांनी चक्क ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ मनूज जिदंल यांनी दिलेल्या सूचना व निर्देशांना पायदळी तुडवले आहे.
या केंद्र प्रमुखांने सहभागी शिक्षकांना चक्क बिर्याणी ची मेजवानी दिली. याशिवाय इतरही अनेक गोष्टी केल्या, त्यामुळे या केंद्र प्रमुखावर कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक महेश देशमुख यांनी केली आहे
फेब्रुवारी २०२३ मध्ये शहापूर तालुक्यात एका कार्यक्रमात शिक्षकांनी झिंगाट गाण्यावर झिंगाट डान्स केला होता. यावेळी त्यांच्या वर टिकेची झोड उठली होती. शिवाय हा विडिओ महाराष्ट्र भर व्हायरल झाला होता. त्यामुळे याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांनी या शिक्षकावर कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा शिक्षण परिषदेत केंद्र प्रमुख अशोक मोरे यांनी सीईओ ने दिलेल्या सूचना व निर्देश यांना बगल देत स्वतः च्या मर्जी नुसार सहभागी शिक्षकांना बिर्याणी पार्टी दिली आहे.त्यामुळे शिक्षण परिषदेच्या मुळ उद्देशाला बाधा पोहचली आहे. याची दखल घेऊन कल्याण येथील समाजसेवक महेश देशमुख यांनी या बिर्याणी पार्टीच्या पुराव्यानिशी तक्रार झेडपी सीईओ मनूज जिंदल यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील झिंगाट डान्स नंतर आता बिर्याणी पार्टी गाजणार आणि वाजणार देखील असे वाटते.
प्रतिक्रिया :-
*डॉ भाऊसाहेब केरकर (शिक्षणाधिकारी, जिप ठाणे)
असा प्रकार झाला असल्यास निश्चितच कारवाई करण्यात येईल, शिवाय याबाबत गटशिक्षणाधिकारी शहापूर यांना ही सूचना देतो.
*महेश देशमुख (समाजसेवक, कल्याण)
मी याबाबत पुराव्यानिशी सीईओ कडे तक्रार दाखल केली आहे, कारवाई होईपर्यंत लढा सुरू ठेवणार.
No comments:
Post a Comment