Monday, 9 October 2023

चोपडा तालुका आशा गटप्रवर्तक यांच्या मेळावा यशस्वी !!

चोपडा तालुका आशा गटप्रवर्तक यांच्या मेळावा यशस्वी !!

*16 ऑक्टोबर पासून बेमुदत संपाचा इशारा मोर्चाचे आयोजन* 

चोपडा, प्रतिनिधी... तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांचा भरगच्च मेळावा जिल्हाध्यक्ष कॉ. अमृत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष कॉ. मीनाक्षी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा येथे अल्पबचत भवन पटांगणात घेण्यात आला. या बैठकीला या मेळाव्याला तालुक्यातील सात पैकी सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका हजर होत्या, आदिवासी भागात संदेश व्यवस्थित न पोहचल्याने मेळाव्यात उपस्थिती कमी होती. त्या मेळाव्यात सर्वांची तक्रारीच्या सुर असा.. वरिष्ठ समजणारे काही कर्मचारी आशांना सन्मानाची वागणूक देत नाही. तसेच आशाना आठवड्याची तसेच महत्वाचा सणांची भर पगारी सुट्टी ध्या, आशांच्या आंदोलन असले की, या आंदोलनाला येऊ नये म्हणून त्यांच्या वर तक्रारी करतात, असे लोक आड काठी घालतात.

हक्कासाठी व अन्याय विरोधात आशाने एकजूट करणे व लढणे हा त्यांचा अधिकार आहे असे नमूद करून सर्वांनी तक्रार केली की, आशांना अँड्रॉइड मोबाईल नाही, रेंज नाही , इंग्रजी भाषेतील ॲप समजत नाही, अशा वेळी केवायसी सारखी अनेक काम करण्याची सक्ती केले जात आहे ,काम केले नाही तर पगार कापला जाईल अशी भिंती दाखवली जाते, घरचे मोबाईल वापरले तर मोबाईल रिचार्ज फक्त शंभर रुपये मिळतात वास्तविक दर तीनशे रुपयांच्या वर आहे तेही मिळत नाहीत, आरोग्यवर्धिनी व मानव विकास या कार्यक्रमाचे पैसे मिळत नाही, शहरी आशांना पुरेसं ट्रेनिंग नाही, जे एस वाय कामात शहरी, नागरी, ग्रामीण भागात मोबदल्यात दुजाभाव आहे वगैरे अनेक तक्रारी त्या ठिकाणी मांडल्या व आपले संघटन नसल्यामुळे आपली वारंवार पायमल्ली होते विना मोबदल्याची काम सुद्धा लागतात हे सर्व प्रकार बंद करायचे असतील तर आपले संघटन मजबूत असणे व सनदशीर संघर्ष उभा करणे गरजेचे आहे यावर सर्वांचे एकमत झाले.

तालुक्यात संघटना मजबूत करावी म्हणून मीनाक्षी सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली सर्व बीटचे अध्यक्ष सचिव अधिक सदस्य मिळून जम्बो कार्यकारणी निवडण्यात आली. त्यात उपाध्यक्षपदी श्रीमती शालिनी पाटील, विद्या पाटील तसेच खजिनदारपदी, सचिव श्रीमती वंदना पाटील, तसेच सदस्य पदी संगीता मराठे, ललिता भादले, विद्यादेवी बाविस्कर, सुशीला कोळी, रेखा पाटील ,शीतल पाटील, चोपडा शहर अध्यक्ष कल्पना महाले, सचिव सविता ओली ,ज्योती खंबायत, प्रतिभा नेहरकर, हसीना तडवी, शारदा माळी, मुक्ताबाई माळी, लता कोळी, छाया पाटील आदींचा संघटनेत कार्यकारणीत समावेश आहे.

मेळावा आटोपल्यानंतर सर्व पदाधिकारी यांनी टी एम ओ कार्यालयास येत्या सो 16 ऑक्टोबर रोजी असून बेमुदत संपाचा इशारा दिला 16 ऑक्टोबर रोजी केमो कार्यालयावर व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, असे संघटनेने मेळाव्यानंतर जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...