Friday, 8 December 2023

महापालिकेच्या ३/क व ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई !

महापालिकेच्या ३/क व ९/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई !

कल्याण, नारायण सुरोशी : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार ३/क प्रभागाचे सहा.आयुक्त तुषार सोनावणे यांनी कल्याण (पश्चिम) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक-पुष्पराज हॉटेल-दिपक हॉटेल- स्टेशन परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे सामान जप्त केले. तसेच १२ हातगाड्या, १५ स्टॉल्स व १० शेड्सवर निष्कासनाची कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी., १ डंपर व ५ मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

९/आय प्रभागातही सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण (पूर्व) येथील मलंग रोडवरील एकूण २ अनधिकृत गाळ्यांचे बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली. तसेच फुटपाथवरील अडथळा निर्माण करणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे सामान जप्त करुन नागरीकांसाठी पदपथ मोकळा केला. त्याचप्रमाणे शहर विद्रुपीकरण करणारे एकूण ९ शेड्सवर आणि ७ हातगाड्यांवर* निष्कासनाची कारवाई केली. *सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी.च्या सहाय्याने करण्यात आली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...