Monday, 11 December 2023

कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी देखील प्रबोधनकार ठाकरे सरोवर‍ परिसरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत साफसफाई मोहिम !

कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी देखील प्रबोधनकार ठाकरे सरोवर‍ परिसरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत साफसफाई मोहिम !

कल्याण , नारायण सुरोशी : रविवारी कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण (पश्चिम) येथील प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या परिसरात साफ सफाई मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रबोधनकार ठाकरे सरोवर परिसरातील जॉगिंग ट्रॅक धुवून घेण्यात आला त्याचप्रमाणे उद्यान परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. तसेच प्रबोधनकार ठाकरे सरोवरातील प्लास्टिकचा कचरा देखील जाळीच्या सहाय्याने उचलून घेण्यात आला. या परिसरातील सतत चोकअप होऊन वाहणा-या गटारातील प्लास्टिक कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या देखील उचलून काढल्यामुळे गटारातून चोकअप होणा-या पाण्याची समस्या दुर झाल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले.

फावडी, खराटे, बांबु-झाडू, घमेली इ. साहित्याचा वापर करीत घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे ४० कर्मचा-यांनी या मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग घेतला.

यासमयी महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँन्ड ॲम्बॅसिडर डॉ.प्रशांत पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार आता दर रविवारी प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे स्वच्छता मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...