Wednesday, 6 December 2023

प्रभाग क्र.१२, १३ आणि १४ मध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन !!

प्रभाग क्र.१२, १३ आणि १४ मध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन !!

*एकच ध्यास.. कल्याण पश्चिमचा सर्वांगीण विकास*

कल्याण, सचिन बुटाला : माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कल्याण पश्चिम मतदार संघामध्ये विकास कामांचा धडाका सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसीच्या प्रभाग क्र.१४ शिवनगरी आणि प्रभाग क्र.१३ विकास कॉलनी - सम्राट अशोक नगर परिसरामध्ये विविध विकासकामांचे माझ्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

ज्यामध्ये शिवनगरी परिसरात काँक्रिट रस्ता तर विकास कॉलनी - सम्राट अशोक नगर परिसरात पोहोच रस्ता आणि नाला बांधण्याच्या कामाचा समावेश आहे. तसेच प्रभाग क्र. १२ जेतवन नगर येथेही विविध कामांचे भूमिपूजन झाले. माझ्या आमदार निधीतून ही सर्व विकासकामे केली जाणार आहेत. येत्या काळात प्रभाग क्रमांक १२, १३ आणि १४ मधील सर्व विकासकामे लवकरच पूर्ण होऊन या प्रभागांचा कायापालट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी विधानसभा संघटक / मा.नगरसेवक मयुर पाटील, मा.नगरसेवक जयवंत भोईर, उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, शाखा प्रमुख रोहन कोट, राजेश पाटील, महेश पाटील, प्रभात मिश्रा, उप शाखा प्रमुख राजेश साबळे , युवासेना शहर अधिकारी दिनेश निकम , उपशहर अधिकारी राकेश पाटील, कल्याण पश्चिम विधानसभा सोशल मीडिया  चेतन काबरे, विभाग आधीकारी चेतन बळुरगी तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...