Friday, 19 January 2024

माणगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार संतोष सुतार यांच्या पिताश्रींचे निधन पळसगाव पंचक्रोशीत दुःखद शोककळा !!

माणगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार संतोष सुतार यांच्या पिताश्रींचे निधन पळसगाव पंचक्रोशीत दुःखद शोककळा !!

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : माणगाव तालुक्यातील  पळसगाव खुर्द गावचे रहिवासी प्रख्यात पत्रकार संतोष सुतार यांचे पिताश्री पांडुरंग महादेव सुतार यांचे बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी अर्थात पळसगाव मुक्कामी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे क्य ७२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सुतार कुटुंबियांवर आणि संपूर्ण पळसगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.    
      कै. पांडुरंग महादेव सुतार हे वारकरी संप्रदायातील सक्रिय सदस्य होते. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, शांत, संयमी आणि मनमिळावू असा होता.  त्यांनी गेली अनेक वर्ष अत्यंत स्वाभिमानाने आपल्या पारंपरिक सुतार व्यवसायाचे काम करून आपला कौटुंबिक उदरनिर्वाह केला. कौटुंबिक प्रपंचा बरोबर परमार्थ साधण्यासाठी ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे भजन, किर्तन सेवा देत होते. नित्य नामस्मरणात स्वतः ला वाहून घेतलेले पांडुरंग महादेव सुतार हे पळसगाव पंचक्रोशीत सर्व प्रिय व्यक्तीमत्व होते. बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्यावर माणगाव तालुक्यातील त्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर पळसगाव खुर्द येथील स्मशानभूमीत बुधवारी सायकाळा अंत्यसंस्कार करण्यात आले. 
     त्यांच्या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कै. पांडुरंग महादेव सुतार यांचा दक्रिया विधी शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी तर उत्तरकार्य विधी  रविवार दि २८ जानेवारी २०२४ रोजी  राहते घरी पळसगाव खुर्द येथे होणार आहेत.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...