Monday, 19 February 2024

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन !!

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन !!

रायगड, दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी चौक, अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी 'जय जय महाराष्ट्र माझा' 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताचे अत्यंत उत्साहात गायन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग प्रांत मुकेश चव्हाण, तहसीलदार (सा. प्र.) उमाकांत कडनोर, तहसीलदार अलिबाग विक्रम पाटील, अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...