Monday, 8 July 2024

समेळगाव गोविंदा पथक सराव, तोच जोश, तोच उत्साह.....

समेळगाव गोविंदा पथक सराव, तोच जोश, तोच उत्साह.....

नालासोपारा ता, ७ :- गोविंदा रे गोपाळा,यशोदेचा तान्हया बाळा, आला रे आला गोविंदा आला.अशा जल्लोषात समेळगाव गोविंदा पथकाचा सरावास दत्त मंदिर समोरील मैदानात  सुरूवात झाली. समेळगाव गोविंदा पथकाने मुंबईतील अनेक मानाच्या दहिहंड्या फोडण्याचा विक्रम केला आहे. 

पथकाने यावर्षी आठ ते नऊ थरांचा संकल्प केला आहे त्यानुसार गोविंदा पथक जोरदार सराव करित आहे.
समेळगाव गोविंदा पथकाचा परिसरात व मुंबईत मोठा बोलबाला आहे, अनेक वर्षापासुन स्थापन केलेल्या समेळगाव गोविंदा पथकाचा नावावर अनेक विक्रम आहेत, गगनभेदी उंचउंच दहिहंडी फोडण्याचा विक्रमाने आपल्या गोविंदा पथकाच नावलौकिक मिळवलं. पालघर, ठाणे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मुंबई मधुन दहीहंडी उत्सवानिमित्त या गोविंदा पथकाला आमंणत्रण येऊ लागलं आणि या पथकाने ठिकठिकाणी थर रचून सर्वांची मन जिंकली.

मुंबईतील प्रतिष्ठीत प्रो गोविंदा, स्वामी प्रतिष्ठान, आमदार रविंद्र फाटक, मनसेचे अविनाश जाधव, आमदार राजन विचारे, या प्रतिष्ठीत गोविंदा उत्सवात पाच हि ठिकाणी सात ते आठ मानवी थरांचे मनोरे रचून  उपस्थितांना थक्क करून सोडले  मागिल वर्षी पाच हि प्रतिष्ठीत दहिहंडी उत्सवात बक्षिसांची लयलुट केली होती. 

समेळगाव गोविंदा पथकाने गोविंदा उत्सवाबरोबरच सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे, समेळगाव गोविंदा पथकाचे नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असुन सर्वस्तरावर कौतुक केले जात आहे, यावेळी शिवसेनेचे प्रतिक जाधव, स्वराज अभियान च्या वतिने शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, शाखा प्रमुख वंदना ढगे, गोविंदा पथक अध्यक्ष रूपेश चव्हाण, सचिव पारस बारोट, खजिनदार वैभव पाटील अमर सावणे, पाटील, बालगोपाळ,स्थानिक नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86% निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !!

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86%  निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !! ** आर्थिक व्यापारगतीचे प्रतिबिंब ...