Tuesday, 3 September 2024

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार !!

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार !!

मुंबई, प्रतिनिधी  : 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना  सुरू करण्यात आली आहे.  या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा. 

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...