Saturday, 23 August 2025

श्री.किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती..

श्री.किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती..


श्री.कारंडे यांचे नाडे तालुका पाटण जिल्हा सातारा हे जन्मगाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही जिद्दीच्या जोरावर पाच वर्षांपूर्वी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून एम.पी.एस.सी मार्फत त्यांची पोस्टिंग झाली होती. त्यांचे पहिले पोस्टिंग सांगली येथे, त्यानंतर वडाळा मुंबई व आता कल्याण मुंबई येथे झाले आहे. श्री.कारंडे हे उपक्रमशील कलाशिक्षक श्री. संपतराव शिंदे व ईगल न्यूज च्या संचालिका व आदर्श शिक्षिका सौ.मीरा संपतराव शिंदे यांचे जावई आहेत.अभ्यास, जिद्द व सचोटीमुळेच आपणास हे यश मिळाल्याचे श्री.कारंडे यांनी स्पष्ट केले.श्री.किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती झाल्याबद्दल समस्त शिंदे परिवार कोरेगाव, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणच्या मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

सौजन्य / वृत्तांत - विलासराव कोळेकर सर 

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...