Saturday, 31 January 2026

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) :
SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण तालुका निवडणूक अधिकारी आविशकुमार सोनोने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार  उद्धव कदम व स्वीप पथक प्रमुख निर्मला घरत तथा गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १६ तारखेपासून उरण तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन मतदान जनजागृती सुरू आहे. शनिवार दिनांक ३१/०१/२०२६ रोजी  नवीन शेवेतून उरण तालुक्यातील सर्व शिक्षकांची मतदान जनजागृती बाईक रॅली निघाली. नवीन शेवे ते दिघोडे पर्यंत ही जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. 

या बाईक रॅलीचा शुभारंभ निवडणूक निर्णय अधिकारी आविश कुमार सोनोने, तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम व निर्मला घरत, केंद्र प्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. स्वीप  कार्यक्रमातील सर्व शिक्षक वर्ग व तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना 'मी मतदान करणारच' नावाची टी-शर्ट देऊन हातामध्ये विविध मतदान जनजागृती बॅनर देऊन रॅली काढण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीच्या वेगवेगळ्या  मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मी मतदान करणारच, चला मतदान केंद्रावर जाऊ या मतदानाचा हक्क बजाऊ या... घोषणा देण्यात आल्या.नवीन शेवे येथून निघालेली रॅली बोकडवीरा जेएनपीटी जासई मार्गे दिघोडे येथे समाप्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...