Sunday, 11 January 2026

न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेतर्फे आधार चषक २०२६ चे आयोजन !!

न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेतर्फे आधार चषक २०२६ चे आयोजन !!

** क्रिकेट स्पर्धेतून मिळणारी  रक्कम वापरली जाते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी व सामाजिक कार्यासाठी 


उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) :
 उरण तालुक्यात तसेच न्हावा शेवा बंदर परिसरात कस्टम हाऊस एजंट(C.H.A.) चे काम करणारे मराठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असून यात स्थानिक भूमिपुत्र मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. सीएचए (कस्टम हाऊस एजेंट) हे जेएनपीटी व न्हावा शेवा परिसरातील विविध कॅन्टेनर, ट्रक, टेम्पो, जड अवजड मालवाहू वाहने यांच्या कागदपत्राचे पासिंगचे (एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे) काम करतात.रात्रंदिवस काम करून, आपला जीव धोक्यात घालून संसार चालवितात व जमेल तेवढं समाजकार्य करतात.अशा या स्थानिक भूमिपुत्र मराठी तरुणांना न्याय मिळावा त्यांचे अधिकार व हक्क त्यांना मिळावेत अपघातग्रस्तांना मदत करता यावी यासाठी न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेची स्थापना झाली.


आज पर्यंत अनेक सामाजिक कार्य या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. आजपर्यंत अपघातग्रस्त व अपघातात मृत्यू पावलेल्या पूर्व विभागातील अनेक व्यक्तींना या संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयाची मदतही करण्यात आली आहे. उरण विभागात सतत होत असलेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबासाठी तसेच दुखापत झालेल्या सीएचए बांधवांसाठी अपघात ग्रस्त निधी संकलनासाठी त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मी मराठी मैदान मोठी जुई, उरण येथे सी एच ए आधार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सीएचए आधार चषक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते व स्पर्धेतील मिळणारी रक्कम अपघातग्रस्तांसाठी व सामाजिक कार्यासाठी वापरली जाते अशा या सीएचए आधार चषकासाठी नागरिकांनी, रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी असे आवाहन न्हावा शेवा सी एच ए आधार सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

माणगाव येथे 'पाणी फाउंडेशन'तर्फे उरणच्या शेतकऱ्यांचा 'गट शेती' मंत्र ; ३ दिवसांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न !

माणगाव येथे 'पाणी फाउंडेशन'तर्फे उरणच्या शेतकऱ्यांचा 'गट शेती' मंत्र ; ३ दिवसांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न ! उर...