सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !
उल्हासनगर, राहुल उघडे :
टाऊन हॉल उल्हासनगर येथे शनिवारी (३१ जानेवारी) गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूलचा पंधरावे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उत्कृष्ट केले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुखविंदर कौर एच् खैरा हे होते, तसेच संस्थेच्या सचिव हरप्रित सिंग खैरा, सदस्य उत्तम सिंग मानकू, गुरजिंदर कौर सिहरा, मनजित कौर तसेच प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील, निलिमा म्हात्रे (सरपंच - मारळ), निलेश देशमुख, आतिश म्हात्रे, पवन जेशवानी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करत संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच कर्मचारी वर्ग, प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, उपस्थित पालक यांनी दोन मिनिटे मौन पाळत मा. अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या नंतर गणेश वंदना करत स्नेहसंमेलनला सुरुवात केली, यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक सुरेख नृत्य तसेच कार्यक्रम साजरे केले. या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनीच अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावीपणे केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुखविंदर कौर एच् खैरा यांनी वार्षिक स्नेहसंमेलन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे अशा विचाराने दरवर्षी असे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते असे सांगितले, तसेच मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे रंगतदार सादरीकरण, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूलचे हे स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरले.
No comments:
Post a Comment