पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर विद्या भवन येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !!
** विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल पाऊच शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप तसेच शाळेकरिता रेफ्रिजरेटर लेझीम प्लास्टिकच्या खुर्च्या माइक व इतर साहित्य दिले भेट
मुंबई (शांताराम गुडेकर) :
पंचरत्न मित्र मंडळ व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर विद्या भवन येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल पाऊच शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप तसेच शाळेकरिता रेफ्रिजरेटर लेझीम प्लास्टिकच्या खुर्च्या माइक व इतर साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.शरद सोनवणे साहेब कार्यकारी संचालक (मा. स -आर.सी.एफ), श्री.सुबोध आचार्य साहेब (विश्वस्त जवाहर विद्या भवन शिवसेना उपनेते), विशेष पाहुणे म्हणून कु.सविता धुमाले मॅडम (मुख्याध्यापिका) उपस्थित होत्या. मंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, उपाध्यक्ष रमेश पाटील, खजिनदार सचिन साळुंखे, श्री..वैभव घरत, मॅथ्यू डिसूजा, रहीम शेख, प्रशांत म्हात्रे, किशोर गरुड, सूर्यकांत वासुदेव, डॉ. संभाजी राऊत, डॉ. रजनीश कुमार, श्रीमती नीलम गावंड आदी पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम सूत्रसंचालन स्नेहा नानिवडेकर मॅडम यांनी केले.
समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत. या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य , कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळूंखे , उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सल्लागार हनुमंता चव्हाण, सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
No comments:
Post a Comment