Monday, 2 February 2026

ट्रेलर खाली चिरडून चालकाचा मृत्यू !

ट्रेलर खाली चिरडून  चालकाचा मृत्यू !

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथील IOTL कंपनी शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणा-या लेनवर एका ट्रेलरच्या खाली चिरडून मजुराचा मृत्यू झाला.मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव बृजभान मुन्डा यादव (३२) असून, तो मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील भीतरी येथील निवासी होता. तो उरण येथे ट्रेलर चालक म्हणून काम करत होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बृजभान यादव याने रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील ट्रेलर क्र. MH-46-BU-4299 हा धुतुम येथील IOTL शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणा-या लेनवर उतारावर थांबवला होता. त्याने ट्रेलरचा हँन्डब्रेक न लावता ट्रेलरमधून खाली उतरून ट्रेलरच्या समोर गेला असता, ट्रेलर उतारावर असल्याने आणि त्यावर भरलेला कंटेनर असल्याने वजनामुळे ट्रेलर पुढे गेला आणि बृजभान यादव याच्या अंगावरून जाऊन तो गंभीर जखमी झाला.बृजभान यादव याला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. उरण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८५, १०६(१) (भा.द.वि कलम ३८३, १०४(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...