नागरी संरक्षण स्वयंसेवकांचा Capacity Building of Civil Defence (क्षमता, बांधणी व विकास) प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण !!
अंबरनाथ प्रतिनिधी: ता. ६,
मा. संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार व आदेशान्वये नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे अंतर्गत उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह,ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८ जानेवारी २०२६ ते ०३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रशिक्षण हॉल, अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे Capacity Building of Civil Defence Volunteer Course No. 12/2026 हा प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पडला.
या अभ्यासक्रमात एकूण २० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला होता. दररोज सकाळी १०.०० ते सायं. ५.४५ या वेळेत प्रशिक्षण देण्यात आले. अभ्यासक्रमाच्या अंतिम दिवशी श्री.अनिल गावित (सहाय्यक उपनियंञक) तसेच मास्टर ट्रेनर डॉ. राहुल घाटवळ यांनी स्वयंसेवकांना महत्त्वपूर्ण व्याख्याने व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यानंतर सहभागी स्वयंसेवकांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.
या कार्यक्रमास श्री. बिमल नथवानी (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेञ-१, ठाणे विभाग), श्री.करमबिर भुर्जी (उपमुख्य क्षेत्ररक्षक,क्षेञ-४, नवी मुंबई विभाग) तसेच श्री. कमलेश श्रीवास्तव (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेञ-३, उल्हासनगर- अंबरनाथ विभाग) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मा. संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई समूह, ठाणे जिल्ह्यासाठी Capacity Building of Civil Defence Volunteer अंतर्गत १२ प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे एकूण ३६० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सदर उद्दिष्ट उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नागरी संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
या प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी स्वयंसेवक अधिक सक्षम होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
No comments:
Post a Comment