Sunday, 15 March 2026

हिंद दी चादर कार्यक्रम व जागतिक नागरी संरक्षण दिन उत्साहात साजरा; ६० स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग !!

हिंद दी चादर कार्यक्रम व जागतिक नागरी संरक्षण दिन उत्साहात साजरा; ६० स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग !!

बातमीदार प्रतिनिधी: ता. (१६), दि. २८ फेब्रुवारी २०२६ व १ मार्च २०२६ रोजी “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जागतिक नागरी संरक्षण दिनाचे औचित्य साधून नागरी संरक्षण विभागामार्फत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ६० नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी यांनी प्रत्यक्ष कर्तव्य बजावत जागतिक नागरी संरक्षण दिन उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमावेळी मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह, ठाणे यांनी उपस्थित कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच ठाणे व रायगड जिल्ह्यातील आपदा मित्र व आपदा सखी यांना शपथ देऊन आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे स्वयंसेवकांमध्ये सेवाभाव व आपत्कालीन कार्याबाबतची बांधिलकी अधिक दृढ झाली.

सदर कार्यक्रमास माहिती अधिकारी, भारत युवा केंद्राचे उपसंचालक, रायगडचे नोडल अधिकारी, ठाणे व रायगड जिल्ह्याचे DDMO अधिकारी तसेच विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्रीगण व विविध मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उपक्रमातून नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी समाजसेवेची भावना जपत आपत्ती व्यवस्थापनात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.

सौजन्य- विश्वनाथ राऊत सर

No comments:

Post a Comment

हिंद दी चादर कार्यक्रम व जागतिक नागरी संरक्षण दिन उत्साहात साजरा; ६० स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग !!

हिंद दी चादर कार्यक्रम व जागतिक नागरी संरक्षण दिन उत्साहात साजरा; ६० स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग !! बातमीदार प्रतिनिधी: ता. (१६),...