Friday, 27 March 2026

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे दादर रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना नेते,खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव मा.श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत मंडळ रेल्वे प्रबंधक श्री हिरेश मीना तसेच चीफ ओ.एस. श्री निरज मेंटल यांच्या उपस्थितीत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने निवेदन पत्र देण्यात आले. या वेळी विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,कक्ष प्रसार श्री.अनंत पवार, कक्ष उपसंघटक श्री.राजेंद्र पेडणेकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.संबंधित रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
              दादर-रत्नागिरी पॅसेंजरमागील काही काळापासून राज्यांतर्गत रेल्वेगाड्या रद्द करून परराज्यातील रेल्वेगाड्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. करोना काळात मुंबई – कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई – मनमाड गोदावरी एक्स्प्रेस, पुणे – भुसावळ पॅसेंजर, पंढरपूर एक्स्प्रेस यांसारख्या असंख्य रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.ज्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आल्याच नाहीत. त्या वेळापत्रकात आता परराज्यात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येत आहेत. कायमची बंद करण्यात आली असून त्याजागी आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण मुंबई आणि कोकणवासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...