Monday, 9 March 2026

महिला दिनानिमित्त सौ.रेखाअत्तरदे यांचा सन्मान !!

महिला दिनानिमित्त सौ.रेखाअत्तरदे यांचा सन्मान !!

कल्याण, प्रतिनिधी :  रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था, कल्याण–सावंतवाडी (रजिस्टर) तसेच वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेच्या प्रमुख मार्गदर्शिका सौ.रेखा अत्तरदे यांना अंबरनाथ विभागात जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

सौ.रेखा अत्तरदे या सामाजिक दृष्टिकोन जपत विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचे हसमुख व मनमिळावू व्यक्तिमत्त्व समाजात आदराने पाहिले जाते. समाजातील विविध उपक्रमांमध्ये त्या सातत्याने सहभाग घेऊन समाजहिताचे कार्य करत असतात.

त्यांच्या या कार्याचा गौरव झाल्यानंतर मित्रपरिवार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रेल्वे प्रवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील सिताराम उत्तेकर यांनीही त्यांना मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...