मुंबई महापौर फेन्सिंग स्पर्धा २०२६ उत्साहात प्रारंभ !!
मुंबई, सचिन ननगरे : मुंबई फेन्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई महापौर फेन्सिंग स्पर्धा २०२६ चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यसम्राट आमदार मा. कालिदास कोळंबकर, माजी नगरसेवक सुनील मोरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे निरीक्षक चंद्रकांत घोडेराव, राज्य संघटनेचे रेफ्री बोर्ड चेअरमन केदार ढवळे, रायगड फेन्सिंग असोसिएशनचे सचिव मिलिंद ठाकूर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दुर्गेश जागीरदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर निलेश मस्करे, विनोद जगताप आणि आनंद वाघमारे हे देखील उपस्थित होते. स्पर्धेची प्रस्तावना मुंबई फेन्सिंग असोसिएशनचे सचिव राहुल वाघमारे यांनी केली. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश, खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच फेन्सिंग खेळाच्या विकासासाठी संघटनेच्या प्रयत्नांची माहिती दिली.
उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत फेन्सिंगसारख्या ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेत मुंबईसह विविध जिल्ह्यांतील स्पर्धक उपस्थित होते..
No comments:
Post a Comment