Thursday, 18 June 2026

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण....

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण....
नालासोपारा ता १४ :- नालासोपारा पश्चिम छेडा नगर येथे रात्री ९  वाजता पायी चालणार्‍या वृद्ध व्यक्तीस बाईक स्वाराने जोरात धडक दिल्याने वृद्ध व्यक्ती खाली पडल्याने हात व पाय मोडला या अपघात व्यक्तीस तसेच टाकून बाईक स्वार फरार झाले. 
या संदर्भात बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक यांना कळताच त्वरित मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देत अपघात ग्रस्त व्यक्तीस सोपारा हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केले.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक व नातेवाईकांना संपर्क करून त्यांना हॉस्पिटल मध्ये बोलवले यावेळी देवदूत म्हणून बहुजन विकास आघाडीचे मंदार राऊत हे धावून येत रुग्णवाहिका चालवून अपघात ग्रस्त व्यक्तीस रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यास मदत केली यावेळी नातेवाईकांनी आभार मानले. 
वाहन चालवताना आपण सर्वानी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अपघातग्रस्तांना वेळेत मदत करणे ही आपली सामाजिक जबाबदारीचा भाग आहे.

No comments:

Post a Comment

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण....

बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक मोफत रुग्णवाहिका सेवा देत अपघात ग्रस्त व्यक्तीचे वाचवले प्राण.... नालासोपारा ता १४ :- नालासोपा...