Thursday, 20 September 2018

मुरबाड च्या किशोर गावात अफवा

किशोर गावामध्ये डेंग्यूच्या साथीच्या अफवेने घबराट !!
====================
  मुरबाड -
  मंगल डोंगरे -
              मुरबाड शेजारील किशोर गावामध्ये ताप व रक्तातील प्लेट लेट कमी असणारे रुग्ण आढळल्याने हि डेंग्युची लक्षणे असल्याने लोकांमध्ये  डेंग्यु रोगाची साथ पसरल्याची अफवेने घबराट पसरली आहे मात्र किशोर गावातील 10 लोकांच्या रक्ताचे नमुने ठाणे येथे तपासणी साठी पाठवले असता फक्त एका इसमाच्या रक्ताच्या नमुन्यात डेंग्यूचे जंतू आढळले असल्याने डेंग्यूची साथ नसल्याचे किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ माधव कावळे यांनी सांगितले.
     आरोग्य विभागाने किशोर गावामध्ये तपासणी सुरु केली आहे तसेच गुरुवारी रात्री गावामधील डास पकडून तपासणी साठी पाठवले आहेत ग्रामपंचायतीने परिसर स्वच्छता तसेच धूर फवारणी केली असून शुक्रवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे
      ठाणे जिल्ह्यापरिषदेचे उपाध्यक्ष सुभाष दादा पवार व जिल्हापरिषद सदस्य प्राजक्ता भावार्थे यांनी गुरुवारी ता 20 किशोर गावास भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी औषधे व कर्मचारी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले त्यांचे सोबत सरपंच जानू गायकर सामाजिक कार्यकर्ते  मोहन भावार्थ व बलिराम अगिवले बाजार समिती संचालक अॅड अजय चौधरी उपस्थित होते
   डॉ माधव कावळे यांनी
     रक्तातील प्लेट लेट फक्त डेंग्यू मुळेच कमी होतात हा लोकांचा गैर समज आहे.इतरही कारणाने त्या कमी होऊ शकतात खाजगी लॅब प्रमाणे किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्त नमुने तपासण्याची व प्लेट लेट वाढण्यासाठी औषधोपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ माधव कावळे यांनी सांगितले व लोकांनी घाबरू नये असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...