कल्याण पूर्व रेल्वे स्कायवॉक उदघाटन
कल्याण - (इम्तियाज खान )
कल्याण पूर्व (कोळसे वाडी कडे जाणारा) ला नव्याने तयार झालेल्या रेल्वे स्कायवॉक काही कारणाने उदघाटन होऊ न शकल्याने वापरात नव्हता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन नाईलाजाने बोगद्याचा वापर करावा लागत होता. वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासन काही हालचाल करत नव्हती.
आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकांच्या आग्रहाखातर जेष्ठ नागरिकांच्या हस्ते फित कापून ,उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवला व नागरिकांना पेढे वाटुन जलोष करण्यात आला. नागरिकां करीता स्कायवॉक खुला करण्यात आला .यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शरदजी गवळी, जिल्हाचे युवा नेते सुभाषजी गायकवाड, राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हा अध्यक्ष मनोजजी नायर, कल्याण पूर्व चे विधानसभा कार्यअध्यक्ष जानू वाघमारे , डोंबवली शहर विधानसभा विध्यार्थी अध्यक्ष हर्ष चौधरी ,कल्याण पूर्व विधानसभा विध्यार्थी अध्यक्ष अनमोल गवळी व इतर विध्यार्थी काँग्रेस चे पदधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tuesday, 25 September 2018
कल्याण पूर्व स्कायवाक जेष्ठ नारीकांनी केला खुला
Subscribe to:
Post Comments (Atom)
वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!
वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
No comments:
Post a Comment