Friday, 10 April 2020

बदलापूर मधील श्री कॉम्प्लेक्स सारख्या ४०० सदनिका धारकांकरिता भाजीपाला स्टॉलची अभिनव योजना

*बदलापूर मधील श्री कॉम्प्लेक्सछ्या  400 सदनिका धारकाकरिता  भाजीपाला स्टॉलची अभिनव योजना* 
बदलापूर :-अरूण ठोंबरे 

21 दिवसाचा लॉकडाऊन असूनसुध्दा काही ठिकाणी लोक गर्दी करतात आणि सरकारच्या वतीने वारंवार सांगून सुद्धा काही कारण काडून  घराबाहेर पडतात. याबाबत श्री कॉम्प्लेक्समध्ये राहणारे जुने रहिवाशी अविनाश देशमुख यांनी आपली कल्पना सोसायटीत मांडली. त्यांच्या या कल्पनेला श्री कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी साथ दिली आणि सदनिका धारकाकरिता  भाजीपाल स्टॉलची व्यवस्था करण्यात आली.
कॉम्प्लेक्सच्याआतील बाजूस लोकांसाठी ही व्यवस्था करून देण्यात आली असल्याने बाहेर जाण्याचे प्रमाण काहीतरी कमी होईल. यावेळी बदलापूरचे नगराध्यक्ष  प्रियेश जाधव ह्यांनी आज या भाजीपाला स्टॉलला भेट देऊन  श्री कॉम्प्लेक्स मधील जनतेचे कौतुक केले , अश्या प्रकारच अनुकरण हे बदलापूर शहरातील सर्व मोठ्या गृहनिर्माण संकुल ह्यांनी करावे असे आवाहन अविनाश देशमुख व प्रियेश जाधव यांनी केले. असे केल्याने  बाहेर पडण्याची लोकांची संख्या कमी होईल आणि प्रशासन आणि पोलिसांवर ताण पडणार नाही.

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...