Saturday, 9 May 2020

कोरोनाचा असाही फायदा? लग्न सोहळे साध्या पद्धतीने तर वधू पित्याची कर्जातून मुक्ती!

कोरोनाचा असाही फायदा? लग्न सोहळे साध्या पद्धतीने तर वधू पित्याची कर्जातून मुक्ती!


कल्याण (संजय कांबळे) संपूर्ण जगाला कोरोनोच्या विषाणूंने मगरमिठ्ठित घ्यायला सुरुवात केली असताना कोरोनाचा हा धसका यंदाच्या विवाह सोहळा आणि वधूपित्यासाठी लाभदायक ठरला आहे असे मिश्किल पणे म्हणावेसे वाटते.
दरवर्षी भारतात सर्वसाधारण पणे तुलशी विवाहानंतर लग्न सोहळे सुरु होतात सर्वच जाती धर्माच्या समाजात या सोहळ्यावर लाखों रुपये खर्च केले जातात. मुलींच्या "सुखासाठी" या गोंडस नावाखाली हे सर्व चालते. विशेषत महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात हे खूपच भयानक आहे. मानपान च्या नावाखाली वधू पिता अक्षरशः कर्जबाजारी होतो. जिच्यावर उपजिवीका केली जाते ती काळीआई अर्थात जमीन कवडीमोल भावाने विक्री केली जाते. जिल्हात अशी हजारो उदाहरणे आहेत की ज्यांनी मुलींच्या लग्नासाठी जमीन विकल्या आहेत.
यंदाच्या वर्षी "भटजीबुवा" ने शेकडो लग्नाचे शुभ मुहूर्त काढले होते. वधू व वर पक्षाच्या मंडळींनी भटजीबुवा ला "दक्षिणा" देखील भरपूर दिल्या होत्या. पण कोरानाने घोटाळा केला. भटजीबुवा चे सर्व शुभ मुहूर्त अशुभ ठरले कोरोना हा संसर्गातून होत असल्याने अनेक मंडळींनी जमलेले विवाह सोहळे पुढे ढकलले तर अनेकांनी अत्यंत साध्या पद्धतीने कमी व-हाडीना घेऊन सोशलडिस्टींग ठेऊन लग्न आटोपली.
याचा फायदा अशा झाला की कपडे, मंडप, हळदीसमारंभ, दागदागिने, मानापमान यावर केला जाणारा लाखोंचा खर्च वाचला. आणि यासाठी काढावे लागणारे कर्ज यातून वधू पित्याची मुक्तता झाली. यामुळे पैशाची बचत झाली अंत्यत साध्या पद्धतीने विवाह सोहळे पार पडले. त्यामुळे कोरोना कोव्हीड 19 हा जगातील नागरिकांची डोकेदुखी ठरला असला तरी आजाराने देशाला, राज्याला आणि पर्यायाने समाजाला अनेक गोष्टी शिकवल्या असे असले तरी कोरोना सारख्या महामारीकडे दुर्लक्ष अथवा डोळेझाक करता कामा नये, याला रोखायचे असेल तर लाॅकडाऊण चे तंतोतंत पालन करावेच लागेल.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...