Tuesday, 5 May 2020

अंबरनाथ मध्ये राबवला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबर भरारीचा महत्वाचा उपक्रम.

अंबरनाथ मध्ये राबवला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबर भरारीचा महत्वाचा उपक्रम

अंबरनाथ :- अरूण ठोंबरे 
कोरोना ग्रस्त रुग्णाची वाढती संख्या बघून तातडीची उपाययोजना करण्याची गरज असताना, अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची अंबर भरारी या संस्थेने दिनांक 5 th May दुपारी 2 वाजता 
शिवकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ.गणेश राठोड यांच्या सहकार्याने जळगाव खान्देश येथील 300 मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना मेडिकल सर्टिफिकेट  वाटप  आमदार डॉक्टर बालाजी किणीकर  यांच्या हस्ते करण्यात आला. जेणेकरून हे सर्व मजूर बंधू भगिनी आपापल्या गावात सुरक्षितपणें जाऊ शकतील.  अंबर भरारी टीम कडून नियोजन करण्यात येत आहे. कोणीही  मजूर बंधू भगिनी अडकलेले असतील आणि त्यांना आपापल्या गावाकडे जायचे असेल तर  त्या सर्वांची आरोग्य तपासणी आणि मेडिकल सर्टिफिकेट डॉ गणेश राठोड यांच्या माध्यमातून मोफत  (विनामूल्या) देण्याची व्यवस्था  करण्यात आली असल्याचे सुनील चौधरी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय...