Friday, 15 May 2020

कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारे भात बियाणे आता मिळणार अकरा ग्रामपंचायती मध्ये, शेतकऱ्यांना मास्क वापरने बंधनकारक !

कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारे भात बियाणे आता मिळणार अकरा ग्रामपंचायती मध्ये, शेतकऱ्यांना मास्क वापरने बंधनकारक!


कल्याण (संजय कांबळे) शेतीचा खरीप हंगाम २०२० /२१ साठी जिल्हा परिषदेच्या सेस ५० टक्के अनुदानावर देण्यात येणारे भात बियाणे आता कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागात न देता ते आपल्या गावातील /तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मिळणार असून यासाठी शेतकऱ्यांनी सोशलडिस्टींग सह तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
देशात कोरोनोच्या वाढत्या धसक्याने लाॅकडाऊण लागू करण्यात आले आहे. तरीही शेतीच्या कामांना यातून पुर्ण पणे वगळण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आला आहे त्यामुळे आता खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे औषधे आदी वेळेवर मिळण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये जि प सेस योजना २०२०/ २१,शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, बांधबंदिस्ती, ७५ टक्के अनुदानावर स्प्रे पंप, ताडपत्री, सुधारित अवजारे, सिंचन साहित्य, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड योजना, आंबा, नारळ, सिताफळ, आवळा आदी योजनांचा समावेश आहे.
कल्याण तालुक्यात ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रात  भाताचे पीक घेतले जाते तर १५० हैक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड केली जाते कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयात यापूर्वी शेतकऱ्यांना भात बियाणे उपलब्ध होत होते. पण सध्या कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, आणि कोरोनोचा फैलाव होऊ नये म्हणून भात बियाणे जया १२० क्विटंल, कर्जत ३:१० क्विंटल, श्रीराम ३० क्विंटल, उपलब्ध करून देण्यात आले आहे परंतू ते तालुक्यातील नागाव, नारिवली, वाकळण, खोणी, बापसई, कांबा, गुरवली, खडवली, काकडपाडा, फळेगाव, वसत शेलवली या अकरा ग्रामपंचायती मध्ये वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे 
यासाठी शेतकऱ्यांने ७/१२ व आधारकार्ड गरजेचे असून शेतकऱ्यांनी येताना तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधून यावे तसेच सोशलडिस्टींग चे पालन करावे असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे तर तालुक्यातील खालील  खाजगी अधिकृत परवाने धारक बियाणे विक्रेते यांच्याकडे खाजगी व महाबीज कंपनीचे बियाणे व खत मिळेल, यामध्ये पठारे अग्रो सेंटर कल्याण, ओम फर्टिलायझर, प्राईम अॅग्रो सेंटर, श्री समर्थ कृपा रायते, साम अॅग्रो सेंटर गोवेली, सद्गुरु कृषी सेवा केंद्र कुंदे, दत्तगुरु अॅग्रो सेंटर खडवली, श्री समर्थ अॅग्रो सेंटर फळेगाव, आणि अंजली भालचंद्र पाटील, शिरडोण आदी केंद्रातून खते व बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असून याचा लाभ घ्यावा असे अवाहन ,कृषी विभाग,कल्याण पंचायत समिती यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...