Wednesday, 28 January 2026

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

संदीप शेंडगे...
कल्याण :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी, समाजप्रबोधक व महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या डॉ. सविता भीमराव आंबेडकर अर्थातच माईसाहेब आंबेडकर यांची जयंती कल्याणमध्ये विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सन्मानपूर्वक साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केलेल्या नवविवाहित दांपत्यांचा, जोडप्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

कर्मवीर दत्त देशमुख सभागृह, ३ रा मजला, उषा संकुल, वीज कंपनी कर्मचारी सहकारी पतसंस्था, सितारा हॉटेल समोर, वलीपीर रोड, कल्याण (प.) येथे ३१ जानेवारी शनिवारी ४.३० वाजता संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक शेतकरी सभेचे राज्य संघटक कॉम्रेड किशोर टमाळे हे असणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून लेखक व साहित्यिक श्री. विजय सुरवाडे हे उपस्थित राहणार आहेत.

डॉ. सविता आंबेडकर यांचा जन्म २७ जानेवारी १९०९ रोजी झाला असून, त्यांनी आयुष्यभर सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि विवेकनिष्ठ समाजरचनेसाठी कार्य केले. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खंबीर साथ देणाऱ्या प्रेरणास्थानी होत्या. त्यांच्या स्मृतिदिनी आयोजित हा कार्यक्रम सामाजिक एकोपा, मानवतावाद आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय महिला फेडरेशन, समता संघर्ष संघटना, सकल भारतीय समाज, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, ऑल इंडिया युथ फेडरेशन, श्रमिक मुक्ति दल, नागरी हक्क संघटना, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC), पुरोगामी विचारमंच, ऑल इंडिया स्टुडंट्स ऑर्गनायझेशन व डॉ. आंबेडकर मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

समाजातील समतेचा संदेश देणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे आयोजक यांना खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
संपर्क :
उदय चौधरी 
मो. ९९६९५००३६९
बाबा रामटेके 
मो. ८०९७५४०४०६
डॉ. सुषमा बसवंत 
मो. ९५९३२८०४९३
विशाल जाधव 
मो. ९९६९३२०३६३

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...