Wednesday, 28 January 2026

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील रामकृष्ण आत्माराम पाटील सभागृहात सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्ञाती समाजाच्या भगिनींचा स्पर्धेतील सहभाग लक्षणीय होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिश पुरव (अध्यक्ष शांती निवास, मुंबई) यांनी भुषविले, तर विशेष अतिथी म्हणून क्षात्रैक्य समाज, ठाणे चे विश्वस्त  पंकज अशोक म्हात्रे उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात विद्यमान अध्यक्ष रंजन अनंत काठे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. रंजन काठे यांनी आपल्या प्रास्ताविकात ज्ञाती समाजाच्या गोसपाड्यातील ताबेकब्जात असलेल्या पण सध्या वापरात नसलेल्या चार गुंठे जागेचा उल्लेख करत लवकरच याही जागेचा वापर समाजाच्या काही उपक्रमांसाठी सुरु करणार असल्याचे जाहीर केले. उपस्थित समाज बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत म्हातवलीच्या सरपंच श्रीमती रिना रुपेश शिरधनकर व उप सरपंच श्रीमती निलिमा प्रदीप थळी यांना सो.क्ष.पा. ज्ञाती समाज उरणच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने  झाली.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...