मोठीजुई शाळेत संगीतमय कवायतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !!
उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मोठीजुई शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि संगीतमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय लोकशाहीचा हा महान सण साजरा करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८ वाजता झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत आणि ध्वजवंदना झाली.
यावर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली 'संगीतमय कवायत'. देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि लयबद्ध कवायतींचे सादरीकरण केले. तसेच एस एम एस डेकोरेटरने तयार केलेल्या सुंदर डेकोरेशनने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या आणि कलात्मक सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक झाले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली
No comments:
Post a Comment