Wednesday, 28 January 2026

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई !

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई !

** हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात.

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर, उरण नगर परिषदेचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, मार्निंग कट्टा विमला तलाव या संघटनेचे सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक, उरण नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी उरण शहरातील विमला तलाव गार्डनमध्ये हातात झाडू घेऊन कचरा साफसफाई केली. कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.उरण स्वच्छ सुंदर दिसावा, नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या दृष्टिकोनातून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे उरण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी सांगितले. 

या स्वच्छता अभियानातून उरणमध्ये होणारा कचरा समस्यांचे लवकरच निवारण करण्यात येणार असल्याचेही भावनाताई घाणेकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...