Wednesday 27 May 2020

विद्युत महामंडळाच्या खांबांना "गंजाचा" कोरोना सडलेले पोल बदलले नाहीत तर पावसाळ्यात वित्तीय व जिवीत हानी !

विद्यूत मंडळांच्या खांबाना 'गंजाचा' कोरोना सडलेले पोल बदलले नाही तर पावसाळ्यात जीवीत व वित्त हानी?


कल्याण (संजय कांबळे) 
वर्षानुवर्षे मागणीकरुनही गावोगावी सडलेले, गंजलेले पोल, जमिनीलगत लोंबकळत असलेल्या विद्यूत तारा, वायरच्या ओझ्याने वाकलेले पोल, कनेक्शन चा पुंजका असे चित्र ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात दिसत असून या खांबाना "कोरोना" झाला की असे उपहासात्मक बोलले जात आहे. यावर वेळीच उपचार (बदलले) केले /गेले नाही तर मात्र येत्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे जिवीत किंवा वित्त हानी होऊ शकते हे सर्व यंत्रणांनी लक्षात घ्यायला हवे.



सध्या सर्वच शासकीय, निमशासकीय यंत्रणा कोरोनोच्या वाढता प्रादुर्भाव रोखायचा कसा यात गुंतला आहे. व ते गरजेचे देखील आहे. पण काही दिवसावर पावसाळा आला आहे. या काळात अनेक नैसर्गिक आपत्ती येत असतात यामध्ये पुर, विज पडणे, विजेचे खांब कोसळणे, तारा तूटने, झाडे पडणे आदी आपत्ती येत असतात. आताचा विचार केला तर गावागावात विद्यूत मंडळांचे गंजलेले, सडलेले पोल हा गंभीर विषय समोर येत आहे.
विद्यूत मंडळाने कित्येक वर्षापुर्वी अगदी गाव, वाड्या वस्त्या, पाड्यात लाईट पोहचवली आहे. काही खांबाना ३०/४० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे ते जमीनीलगत सडलेले गंजलेले आहेत. तर काही पोल दाट लोकवस्ती असलेल्या भागात उदा म्हारळ, वरप कांबा मोहना, खडवली आदी ठिकाणी आहेत. एकाच पोलवरून हजारो कनेक्शन घेतल्याने तेथे वायरची जाळी तयार झाली आहे आहेत, अनेक ठिकाणी विद्यूत वाहक तारा जमिनी लगत लोंबकळत आहेत. यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. म्हारळ येथे अंगावर विजेची तार पडून नागरिकाचा जीव घेला होता, वाहोली येथे दोन आदीवाशींना शाॅक लागुन जीव गमवावा लागला होता. कांबा, उंबार्डे, सापाड बांधणेपाडा येथे शेतकऱ्यांचे बैल गाय, म्हैस शाॅक लागून मेले होते. अशा अनेक घटना घडल्या आहेत.
सध्या सडलेले पोल, लोंबकळत असलेल्या विद्यूत तारा, वाकलेले खांब हे जिल्हय़ातील सर्व गावात कमी अधिक प्रमाणात आहेत शहापूर तालुक्यात११० ग्रामपंचायत आणि २३६ गावे आहेत, मुरबाड १२७ ग्रामपंचायती, कल्याण ४६ ग्रामपंचायती १२४ गावे, भिवंडी १२१ ग्रामपंचायती, आहेत या सर्व भागात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी याकडे विद्यूत मंडळांच्या अधिका-यानी लक्ष देऊन संभाव्य होणारी जिवीत व वित्तहानी रोखावी अशी मागणी ग्रामस्थांनमधून केली जात आहे.
या संदर्भात विद्यूत मंडळांच्या कल्याण ग्रामीण उभारणी विभागाचे उप कार्यकारी अभियंता डि डी धुवे यांना विचारले असता ते म्हणाले "हि बाब लक्षात घेऊन टिटवाळा, गोवेली खडवली, मोहना, मांडा या परिसरातील ४०/५० पोल बदलले, शिवाय कंन्टेसर, ट्रास्नफार नवीन टाकले, तारेवर येणारी झाडे तोडली, आदी कामे केली, तरिही आम्ही काळजी घेईन" 

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...