Sunday, 17 May 2020

कल्याण तालुका पॅटर्न हितकारक, नागरिकांचा सिंहाचा वाटा कोरोना मुक्तीकडे वाटचाल!

कल्याण तालुका पॅटर्न हितकारक, नागरिकांचा सिंहाचा वाटा कोरोना मुक्तीकडे वाटचाल!.


कल्याण (संजय कांबळे) संपूर्ण राज्यभर कोरोनोच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कल्याण तालुका मात्र काही अपवाद वगळता कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असून याचे सर्व श्रेय ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस, यांना दिले पाहिजे तर यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो तालुक्यातील नागरिकांचा!
कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे राज्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, आदी जिल्ह्यातील कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन हादरुन गेले आहे. कल्याण तालुक्याच्या शेजारी असलेल्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्दीत, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, शहापूर या ठिकाणी कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र कल्याण तालुक्यात अद्याप तरी चार, पाच रुग्ण आहेत. सुरवातीच्या काळात कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पाचवा मैल येथे दिल्लीला जाऊन आलेले दोघे, किंवा गुरवली येथील मंत्र्यांचा अंगरक्षक, आणि यानंतर कोलम येथे सापडलेला पेंशंट यातील दोन तीन रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव आले असले तरी यांनतर या ग्रामपंचायतीने केलेली उपाययोजना, यामध्ये सॅनिटायझर ची फवारणी, मास वाटप, साफसफाई, यांनतर दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र, खडवली प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी, नर्स, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आणि लाॅकडाऊण ची कडक अंमलबजावणी करणारे कल्याण तालुका पोलीस, यांच्या सर्वांच्या कष्टांचे फळ म्हणजे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले.
विशेष करून कांबा, म्हारळ, वरप, कोलम केळणी, गुरवली, खडवली, खोणी, पिंपरी, उशीद, घोटसई, आपटी, मामणोली, फळेगाव, काकडपाडा, बापसई आदी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील,यांच्या यांना वेळोवेळी सकारात्मक मार्गदर्शन करणारे विस्तार अधिकारी, यांना "सूचना" देणारे "कर्तव्यदक्ष" आणि कार्यतत्पर गटविकास अधिकारी, तहसीलदार दीपक आकडे व सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे संयम आणि सहनशीलता ठेवून जबाबदारी ओळखून तशी कृती करणारे तालुक्यातील समस्त "जनता जनार्दन" यांच्या मुळेच आज कल्याण तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. अपवाद फक्त निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतीचा आहे. तरीही लक्षात घ्या अजूनही धोका टळला नाही आपल्या आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आपण सदैव सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करायला हवे, तेव्हाच आपला तालुका पुर्ण पणे कोरोना मुक्त होईल.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...