Wednesday, 24 June 2020

RTE 25% प्रवेश सन 2020-2021प्रक्रिया सुरू!

RTE 25% प्रवेश सन 2020-2021प्रक्रिया सुरू! 

कल्याण (संजय कांबळे) ज्या पालकांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश RTE अंतर्गत झाले आहे त्या पालकांनी rte portal चे चेक करावे  .या वर्षी कोविड 19 विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी सदर प्रक्रिया पंचायत समिती कल्याण स्तरावर होणार नाही.पालकांचे कागदपत्र तपासणी कामकाज शाळेत होणार आहे.शाळेकडून आपल्या मोबाईल वर मेसेज येईल.त्यादिवशी शाळेत उपस्थित राहावे .परंतु पालकांनी मेसेज वर अवलंबून राहू नये .RTE portal वर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख पहावी.असे अवाहन कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला अतरगे यांनी केले आहे. 
सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी जी शाळा मिळाली आहे त्या शाळेत आपल्या मूळ कागद पत्र व झेरॉक्स कॉपी  सेल्फ attested सहित उपस्थित राहावे.तसेच सोबत आपल्या मुलांना नेऊ नये.शाळेतून आपणास मेसेज येईल त्या दिवशी शाळेत उपस्थित राहून शाळे मार्फत  कागदपत्रे तपस्वित  .कागदपत्रे बरोबर असतील तात्पुरता प्रवेश दिला जाईल. तसे हमी पत्र पालकांनी शाळेला द्यावे .तालुका पडताळणी समितीने व्हेरिफकेशन केल्यावर प्रवेश अंतिम होईल . त्या साठी पालकांना पंचायत समिती कल्याण येथे येण्याची आवश्यकता नाही.
तसेच प्रतिबंधित क्षेत्रात कोविड 19 प्रादुर्भाव कमी झाल्यावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल.याची पालकांनी नोंद घ्यावी.
पालकांनी शाळेत प्रवेशासाठी जाताना मास्क लावून जावा. व शाळेत सामाजिक अंतर राखावे. जेणकरून आपण व शाळेतील कर्मचारी सुरक्षित राहतील..असे सांगून पालकांनी स्वतः सह इतरांचीही काळजी घ्यावी असे गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला अतरगे मॅडम यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...