Monday 27 July 2020

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कार्यान्वित तर मुगवली येथील प्रस्तावित कोविड केअर सेंटर ! "पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली भेट"

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कार्यान्वित तर मुगवली येथील प्रस्तावित कोविड केअर सेंटर ! "पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली भेट"


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील १०२ बेडच्या कार्यान्वित असलेल्या तर मुगवली येथील ४४ बेडच्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरला ( रविवार,दिनांक २६ जुलै रोजी ) भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष करोना बाधित रूग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस करुन प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांबद्दल माहिती जाणून घेतली.
       पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधताना येथील रुग्णांनी या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, जेवण, स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा उत्तम असल्याचे सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री कु.तटकरे यांनी येथील दाखल रुग्ण व निरीक्षणाखालील रुग्ण यांची माहितीही जाणून घेतली. या कोविड केअर सेंटरमध्ये दिल्या जात असलेल्या सेवांबद्दल तेथील रुग्णांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया ऐकून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
      यानंतर मुगवली येथील ४४ बेडच्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरलाही त्यांनी भेट दिली. तसेच त्या ठिकाणीही रुग्णांना सर्व प्रकारच्या उत्तम वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
       यावेळी प्रातांधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, गटविकास अधिकारी श्री.गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी श्री.परदेशी, निवासी नायब तहसिलदार श्री.भाबड हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...