Friday, 17 July 2020

*नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांची कोरोनावर यशस्वी मात,रिपोर्ट आले निगेटिव्ह*

*नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांची कोरोनावर यशस्वी मात,रिपोर्ट आले निगेटिव्ह*


नवी मुंबई - नवी मुंबईचे माजी उपमहापौर तथा लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघाचे  मागील उमेदवार श्री अविनाश लाड यांनी कोरोनावर विजय मिळवला आहे.त्यांनी डाॅक्टर,परिचारिकांचे तसेच बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या कार्यकर्त्यांचे  आभार मानले आहेत.सध्या त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते ठणठणीत बरे झाले आहेत.
   गेल्याच महिन्यात १२ जून रोजी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.नवीमुंबईतील हाॅस्पीटल फुल झाल्याने डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरातच उपचार सुरु करण्यात आले होते.उपचारानंतर त्यांची प्रकृती आता उत्तम असून ते ठणठणीत बरे आहेत.कोरोना संकटकाळात गेले अनेक दिवस ते जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरले होते.नवीमुंबईतील आपल्या वार्डातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंचा नियमित पुरवठा करण्याबरोबरच त्यांनी लांजा-राजापूर-मतदार संघातही मदतीचे कार्य सुरु ठेवले होते.जनतेच्या आशिर्वादामुळे ते सुखरुप आहेत.लवकरच ते व्हिडीआेद्वारे संवाद साधणार आहेत.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...