धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा तरूनपिढी समोर आदर्शमय उपक्रम.
वृक्षारोपणाने सोमनाथ धिर्डे यांचा वाढदिवस साजरा.
शहापुर—वाढदिवस साजरा करणे ही आज एक प्रकारची फॅशन बनली आहे, देश कोरोनो च्या संकटात सापडला असताना दुसरीकडे दिवसेंदिवस वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय, परंतु सामाजिक भान जपत धर्मवीर युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ धिर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय आश्रम शाळा लेनाड (बु.) (गोकुलगाव, आंबिवली) येथे वृक्ष लागवड करून तरुण पिढीसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.जगन्नाथ मडके सर, ग्रामपंचायत सदस्य अरुण धिर्डे, एथिलेटिक्स खेळाडू महेश भोईर, धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सचिव कु.गणेश धोंडू चौधरी, प्रसिद्धी प्रमुख कु.पंढरीनाथ ढमके, जनार्दन विशे, शंकर सापळे, मयुर धिर्डे, जगदिश कशिवले, राहुल विशे, समिर विशे तसेच धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सदस्य, आश्रम शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:
Post a Comment