Wednesday, 15 July 2020

"मुरबाड शहरालगत आढळले जिवंत पीपीई किट",,शहराची सुरक्षितता धोक्यात ? *पत्रकारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला...*

"मुरबाड शहरालगत आढळले जिवंत पीपीई किट",,शहराची सुरक्षितता धोक्यात ?
*पत्रकारांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळला...*


*सदर घटनेप्रकरणी मुख्याधिका-यांचे गुन्हा दाखल करण्याचे संकेत *


मुरबाड (मंगल डोंगरे) : मुरबाड नगर पंचायत हद्दीतील खरब्याची वाडी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ शेजारी काल चक्क दोन जिवंत पी.पी.ई किट आढळून आल्याची धक्कादायक बाब घडली आहे. त्यामुळे हे पीपीई किट याठिकाणी कसे आणि कुठून आले? हा संशोधनाचा विषय बनला असुन, वाढत्या कोरोना संख्येत मुरबाड शहराची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

काल दुपारपासून या  रस्त्या शेजारी पडलेल्या या पीपीई किटची चर्चा सोशल मिडीयावर जोर धरून होती. याबाबत माहिती मिळताच मुरबाड तालुक्यातील काही पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन मुरबाड तहसीलदार, पोलिस स्टेशन तसेच नगर पंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणेशी वारंवार संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली.  त्यानंतर आरोग्य खात्याशी संपर्क साधुन हि बाब कळवली.
   असता ,मुरबाड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे यांनी सदर प्रकरणी मला चारपाच पत्रकारांचे फोन कॉल्स आले असून हे काम आमचे नसून नगर पंचायतला कळवा, अशी सूचना देऊन हात वर केले. त्यानुसार तात्काळ मुरबाड नगर पंचायतचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांना संपर्क करून माहिती कळविण्यात आली. अखेर रात्री साडे आठच्या सुमारास घटनास्थळी पोहचलेल्या नगर पंचायतीच्या दोन कर्मचाऱ्यांनी सदरचे धोकादायक किट जाळून टाकल्याने पत्रकरांनी घटनास्थळ सोडले. त्यामुळे मुरबाड तालुक्यातील पत्रकारांच्या दक्षता आणि प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला. तर जीव धोक्यात घालून मुरबाड शहरवासीयांची सेवा करणाऱ्या या नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे उपस्थित पत्रकारांनी आभार  मानले.

   यापूर्वी अशीच घटना दिल्ली आगरा येथे घडली होती. संपुर्ण देशाचे  लक्ष या घटनेने वेधून घेतले होते. मात्र महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचे भासत असून ज्या ठिकाणी हे किट पडले होते, तेथे समोर लोकवस्ती आहे. तसेच वाहनांच्या वर्दळी व्यतिरिक्त कामगार या पीपीई किट शेजारून अनावधानाने जात होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी या सर्वांना सावध करण्याचे काम केल्याने मोठ्या अनपेक्षित हानीला आळा बसला आहे. 
  मात्र मुरबाड नगर पंचायतचे मुख्याधिकारी अशा पध्दतीने मुरबाडकारांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर  फौजदारी कारवाई करतात का? हे बघणे आता महत्त्वाचे आहे.
मुळात पीपीई किटची विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने विशेष उपाययोजना जारी केली आहे. हे पीपीई किट ब्लु आणि व्हाइट अशा दोन रंगात असतात. ४०, ५०, ८०, ९० अशा विविध जि. एस. एम. आकारमानात हे उपलब्ध असून त्यांच्या किंमती १०००, १२००, १५००, ते २००० पर्यंत असतात. पीपीपई किट परिधान करणाऱ्या व्यक्तीने त्याला रिमूव्ह करतांना विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते. कारण याच दरम्यान इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. वापरून झालेले पीपीई किट एका विशिष्ट प्रकारच्या पिशवीमध्ये भरले जातात. त्यात हायफो केमिकल फवारून त्यास बंदिस्त करणे अपेक्षित आहे. 'बायो मेडिकल वेस्ट' (BMW) वाले येऊन या पिशव्या विल्हेवाटसाठी घेऊन जातात. 
  खाजगी कोविड दवाखान्यांचे प्रति बेड नुसार ठरलेल्या दरात या बायो वेस्ट कंपन्यांशी करार असतात. एक निश्चित वेळेत ते येऊन या वापरलेल्या पीपीई किटच्या पिशव्या ताब्यात घेतात व नंतर त्याची अधिकृतपणे विल्हेवाट लावली जाते. तर शासकीय रुग्णालयात याबाबत हा निष्काळजीपणा अपेक्षित नाही. मात्र असे असतांना हा गैरप्रकार सामान्य नव्हे. तेव्हा या घटनेची कडक चौकशी होऊन दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे. याबाबत मुख्याधिका-यांनी सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...