"मुरबाड येथिल खाजगी कोवीड रुग्णालयाने घेतले तीन बळी ! लाखो रुपये घेऊनही प्रेताच्या विल्हेवाटीस टाळाटाळ"!
*चुकीची उपचार पद्धती आणि मुदत संपलेल्या औषधांचा वापर होत असल्याचा नातेवाईकांचा आरोप*
मुरबाड-{ मंगल डोंगरे } कोरोना महामारीचा मुरबाड तालुक्या मध्ये शिरकाव झाला.आणि उपचारासाठी बाहेर प्रवेश मिळत नसल्याने अनेक रुग्णांना त्याचा भुर्दंड बसला.आणि मुरबाड मध्ये तातडीने एक शासकीय व एक खाजगी असे दोन कोरोना रुग्णालय एक आठवड्या पुर्वी सुरू झाले.त्यानंतर तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते .मात्र दोन दिवसांच्या फरकाने तिन कोरोना रुग्णांचा गणपती मल्टीस्पेशालीटी या खाजगी कोव्हीड रुग्णालयात म्रुत्यु झाल्याची घटना घडल्याने नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला. खरे तर रुग्णांची हेलसांड नको,तातडीने उपचार मिळावेत यासाठी या खासगी कोव्हीड सेंटरला जिल्हा आरोग्य विभागाने परवानगी दिली.मात्र त्या ठिकाणी हवे असणारे तज्ञ डॉक्टर,अनुभवी स्टाफ,उपलब्ध नसतानाही हे कोव्हीड सेंटर सुरु झाले. आणि एका आठवडा भरात , तिन रुग्णांना आपला जिव गमवावा लागला.नव्हे तर चुकीची औषधौपचार पद्धती,बेसुमार फी,आणि बिनकामी आरोग्य यंत्रणा, अशा या गोष्टी तेथे म्रुत झालेल्या रुग्णांच्या म्रुत्त्युचे खरे कारण असल्याचे म्रुत व्यक्तींच्या नातेवाईकानी सांगितले. तर कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना,कोरोनाच्या नावावर सुरु असलेला लुटमारीचा धंदा सुरु असल्याचा अनेकांचा आरोप आहे. आज या हाँस्पिटल मध्ये सदरच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यानें हॉस्पिटलच्या बाहेर शेकडो नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याने तालुक्यातही खळबळ माजली आहे.मुरबाड शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला एक आठवडया पुर्वी शासकीय कोरोना सेंटरचे उद्घाटन झाले. त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशां नुसार डॉ.राहुल कोळी व डॉ.प्रमोद पष्टे यांनी सारीका हॉटेल शेजारच्या ईमारतीमध्ये मध्ये खाजगी कोवीड हाॕस्पिटल सुरू केले आहे. या मध्ये तालुक्यातील व तालुक्या बाहेरील रुग्ण उपचार घेत आहेत त्यांतील दोन दिवसांपूर्वी एका पासष्ट वर्षे वयाच्या इसमाचा मृत्यू झाला तर गुरुवारी सकाळी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे या हॉस्पिटलमध्ये सतत मृत्यू होत असल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांची झाल्याने शेकडो नातेवाईकांनी हॉस्पिटल बाहेर जमुन एकच आक्रोश केला आहे.याशिवाय या हाँस्पिटलने मृत पावलेल्या व्यक्तींच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मुरबाड मध्ये व्यवस्था केली नसल्याने हॉस्पिटल मधिल डॉक्टर मुरबाड नगर पंचायतीच्या प्रशासनाकडे बोट दाखवतात. तर नगरपंचायती चे मुख्य अधिकारी परीतोष कंकाळ यांना विचारणा केली असता प्रेताची विल्हेवाट लावायची व्यवस्था नगरपंचायती कडे नसल्याने खाजगी हॉस्पिटलने स्वखर्चाने विठ्ठल वाडी येथील स्मशानभूमीमधे विल्हेवाट लावावी. सदर हाॕस्पिटलच्या डाॕक्टरांनी या मृत पेशंटचे लाखो रुपये बिल घेऊन सुद्धा दोन्ही रुग्ण सकाळी मृत्यू पावले असताना संध्याकाळी उशीरा पर्यंत या रुग्णांचे शव हाॕस्पिटल मधेच पडून होते. त्याचा परिणाम त्या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांवर होतो.याचे भान न ठेवता हाँस्पिटलच्या डॉक्टरां कडून जबाबदारी झटकली जात असल्याने मृत रुग्णांच्या नातेवाइकांची परवड झाली आहे. यामुळे खाजगी रुग्णालया वरचा नागरिकांचा विश्वास उडत चालला असून अशा लाखो रुपये बिल घेणाऱ्या हाॕस्पिटलची राज्य व केंद्र सरकारने चौकशी करुन जनतेला या कोरोना संकटात दिलासा द्यावा .अशी मागणी नागरिक स्थानिक आमदारांकडे करत आहेत .
तर तालुक्यात कोरोना रुग्णांची खाजगी हाॕस्पिटल मध्ये अशा प्रकारची आर्थिक लुटमार व गैरसोय होत असेल तर अशा हाॕस्पिटल चालवणारे डाॕक्टर यांची चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे. "आमदार -किसन कथोरे" यांनी म्हटले आहे. तसेच खाजगी हाॕस्पिटल व डाॕक्टर कोवीड रुग्णांची आर्थिक लुटमार करत असतील व योग्य सेवा देत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे डाॕ.कैलास पवार- जिल्हा सिव्हिल सर्जन.


No comments:
Post a Comment