"आम आदमी पार्टी, महाराष्ट्र - ठाणे जिल्हा समितीची घोषणा"
कल्याण : आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक रंगा राचुरे व सचिव धनंजय शिंदे यांनी गेल्या ३.५ महिन्यांपासून कोरोना च्या काळात जनतेची सेवा करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. हे काम करतानाच आपण सर्वांनी "*राष्ट्र निर्माण अभियान - सेवा आणि संपर्क*" कार्यात आपले योगदान असेच चालू ठेवायचे आहे असे सांगितले.
येणाऱ्या काळात AAP महाराष्ट्र बूथ स्तरावरील संगठन निर्माण करताना च जिल्हा परिषद, पंचायत समिति, स्थानीय स्वराज्य संस्था, नगर पालिका व महानगर पालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहोत असे जाहीर केले.
या प्रक्रियेचा भाग म्हणून *ठाणे जिल्हा* समितीची घोषणा केली व नियमावली जाहीर केली.
ठाणे जिल्हा समिती.
१. *संयोजक* : एम एल पचौरी
२. *सह संयोजक* : सतीश सलूजा
*सह संयोजक* : मोहम्मद बगदादी
३. *सचिव* : दुरिय्या घडिय़ाली
४. *सह सचिव*: चिराग हरिया
५. *खजिनदार*: विश्वनाथ अय्यर
६. *सह खजिनदार* : विनोद गुप्ता
७. *महिला विंग अध्यक्ष* : नीलम व्यहवारे
८. *युथ विंग अध्यक्ष* : मिथिलेश झा
*सूचना* ( नियमावली )
१. ही समिती लोकशाही प्रक्रियेनुसार काम करून पक्षाचा *ठाणे* जिल्ह्यात प्रसार करेल.
२. ही समिती *पालघर - ठाणे विभागीय समिती* च्या मार्गदर्शनाखाली काम करेल.
३. ही समिती बूथ पातळीपर्यंत पक्षाची मजबूत संघटना बांधणी करेल.
४. ही समिति सर्व निर्णय सामूहिक पद्धतीने घेईल.
५. जिल्ह्यातील महिला विंग, छात्र युवा संघर्ष समिती (CYSS), युथ विंग (AYW), ऑटो विंग, डॉक्टर्स विंग आदि समित्या जिल्हा समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करतील.
६. या समितिच्या माध्यमातून तालुका समित्या गठित करण्यात येतील
तसेच सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली की त्यांनी पक्ष बांधणीच्या कामात सक्रिय भाग घेऊन *ठाणे जिल्हा समितीला* यशस्वी करावे.
नवीन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
या पूर्वी जिल्ह्यात किंवा तालुक्यात असलेले सर्व पद व समित्या रद्द करण्यात येत आहेत, याची नोंद घ्यावी असे सांगितले.
*आम आदमी पार्टी महाराष्ट्र,*
रंगा राचुरे, संयोजक
धनंजय शिंदे, सचिव

No comments:
Post a Comment