Tuesday, 14 July 2020

"दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक मुरबाड शाखा तीन दिवस राहणार बंद"!

"दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕक मुरबाड शाखा तीन दिवस राहणार बंद"!  


मुरबाड ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवंसेदिवस वाढत असुन ती साखळी तोडण्यासाठी मुरबाड नगर पंचायत ने पून्हा एकदा 100 % बंदचा आदेश काढला असुन दिनांक 13/07/2020 पासून 20/07/2020 पर्यंत मुरबाड नगर पंचायत हद्दीत बाजार पेठ बंद केली आहे.परंतु अत्यावश्यक सेवेतील आस्थापना ,बँक,दवाखाने,आणि मेडिकल ह्या गोष्टी सुरु आहेत. मात्र अशातच मुरबाड शहरातील  मुख्य शाखा असणाऱ्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेंचे शाखेमधील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची   लागन झाल्याने मुरबाड नगरपंचायतच्या आदेशानुसार  सदर बॕक  दि.१४जुलै ते १६ जुलै अशी तीन दिवस बंद राहणार असल्याचा बॕक प्रशासनाकडून माहिती देण्यात आली  आहे.                           मुरबाड शाखा ही तालुक्यातील मुख्य शाखा असल्याने या शाखेत तालुक्याच्या अनेक भागातून खातेदार येत असतात. खातेदारांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन बँकेने  ही  खबरदारी घेतली आहे. येत्या तीन दिवसाच्या बंद काळात ज्या खातेदारांना अतंत्य तातडीची पैशाची गरज असेल ,त्यांनी नजीकच्या शिवळे,सरळगाव ,म्हसा या बॕकेंच्या शाखेमध्ये जाऊन किंवा ए.टी.एम,कार्डचा वापर करुन बॕकेस सहकार्य करण्याचे आवाहन बॕकेंचे व्यवस्थापक संतोष घुडे यांनी खातेदारांना केले आहे.

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...