वरप येथील कोरोना कोव्हीड सेंटरला खासदार, जिल्हाधिकारी आणि उमपा आयुक्तांची भेट ग्रामीण भागाला वाली कोण?
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील वाढत्या कोरोनोचे संटक डोळ्यासमोर ठेवून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वरप येथे दोनशे बेडचे कोरोना कोव्हीड सेंटर निर्माण करण्यात आले. परंतु आज अचानक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि उल्हासनगर पालिका आयुक्तांसह भेट दिली आणि येथे दोनशे च्या जागी पाचशे बेडचे आयसीयू केंअर सेंटर उभारण्याचा सल्ला दिला जेणेकरून उल्हासनगर व परिसरातील पेंशंट येथे उपचारार्थ दाखल करता येईल. त्यामुळे आता ग्रामीण भागातील पेंशंट ला वाली कोण? असा प्रश्न पडला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मुरबाड तालुक्यात कोरोना कोव्हीड सेंटर सुरू झाले. व यामुळे त्या भागातील नागरिकांची मोठी सोय झाली. त्याचप्रमाणे कल्याण तालुक्यातील व परिसरातील लोकांची सोय व्हावी म्हणून वरप येथील राधा स्वामी संत्सग येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याचे काम नेटाने होऊ लागले. अगदी कल्याण तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे मंडल अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जिवाचे रान करून एक एक वस्तू जमा करून राधा स्वामी संत्सग येथे २०० बेडचे कोरोना कोव्हीड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या. थोड्याफार किरकोळ कामे वगळता हे सेंटर तीन ते चार दिवसात सुरु होईल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळणार होता. कारण येथील कोरोना पाॅझिटिव रुण्गांना शहरी भागात काय वागणूक मिळत होती याचा अनुभव म्हारळ वरप कांबा पावशेपाडा गोवेली, कोलम येथील पेंशंट नी घेतला होता.
सध्या उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर, टिटवाळा कल्याण, डोंबिवली आदी शहरी भागात कमालीचे पेंशंट वाढत आहेत याच धर्तीवर कल्याण चे खासदार डॉ श्रीकांत शिंदे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त राजा दयानानी यांनी वरप येथील कोव्हीड केअर सेंटर ला भेट दिली. यावेळी येथील नोडल आॅफिसरला या बाबतीत माहिती विचारली तेव्हा येथे २०० बेडचे केअर सेंटर सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी येथे सुसज्ज जागा आहे. ५०० बेडचे आयसीयू व आॅक्शिजन असे सुसज्ज हाॅस्पिटल सुरु करा अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बघू असे उत्तर दिले. खा शिंदे यांची वैद्यकीय दृष्टीने सूचना जरी योग्य व चांगली असली तरी याला कालावधीही लागणार आहे. तसेच सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे पेंशंट वाढत आहेत. त्यांना शहरी भागात बेड मिळत नाही. यांचे काय? ग्रामीण भागाचा विचार कोण करणार हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ग्रामीण भागातील रुग्णानां शहरी भागात कसे बेड मिळतील याचा ही विचार करावा असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या केअर सेंटर मध्ये ग्रामीण रुग्णांचा प्राधान्याने बेड मिळायलाच हवे अशीच प्रत्येकाची इच्छा आहे.
या प्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ मनिष रेगे, कल्याण तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मानकर, पाटील, नोडल आॅफिससर डॉ कापूसकर, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी, शहाड तलाठी सुर्यवंशी तात्या आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
१)हिरालाल सोनवणे, मुख्यकार्यकारी अधिकारी ठाणे जिप
"जिल्हाधिकारी यांना संपूर्ण जिल्ह्य़ाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यांच्या कडून निधी उपलब्ध होतो त्यामुळे याबाबत तेच निर्णय घेतील.
२)दिपक आकडे - तहसीलदार, कल्याण.
" काही दिवसातच हे कोव्हीड केअर सेंटर सुरू होईल यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना प्राधान्य दिले जाईल.
३)श्रीमती श्वेता पालवे - गटविकास अधिकारी, कल्याण पंचायत समिती.
" वरप येथील कोव्हीड केअर लवकरच सुरू व्हावे ग्रामीण भागात पेंशंट वाढत आहेत. यांना प्राधान्य दिलेच पाहिजे.
४)रमेश बांगर - उपसभापती कल्याण पंचायत समिती. कल्याण.
" वरप येथील कोव्हीड केअर हे ग्रामीण भागाला मोठा आधार आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना येथे घ्यायलाच लागेल.
५)डॉ भगवान भोईर - सदस्य, वरप ग्रामपंचायत
" या हाॅस्पिटल मध्ये प्रथम स्थानिक रुग्णानां प्राधान्याने दाखल करून घेतले पाहिजे.


No comments:
Post a Comment