Sunday, 19 July 2020

गटारी जोमात, कोरोना कोमात, मटन चिकन मच्छी आणि वाईन दुकानात तोबा गर्दी सोशलडिस्टींगशन ची लक्तरे वेशीवर?

गटारी जोमात, कोरोना कोमात, मटन चिकन मच्छी आणि वाईन दुकानात तोबा गर्दी सोशलडिस्टींगशन ची लक्तरे वेशीवर?




कल्याण (संजय कांबळे) संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोना वर आज गटारी अमावस्या मात्र भारी पडली. कारण आजची मटन, चिकन, मच्छी आणि वाईन दुकानात झालेली तोबा गर्दी पाहून आपल्या कल्याण ग्रामीण भागात कोरोना कोव्हीड ही वैश्विक महामारी आहे यावर कोनाचाही विश्वास बसला नसता. या ठिकाणी सोशलडिस्टींगशन ची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेल्याचे चित्र दिसत होते. काय म्हणावं या मुर्खाना?


आज जग, देश, राज्य, जिल्हा, तालुका किंवा खेडेगाव या कोरोनाने सोडले नाही. या वैश्विक महामारीमुळे कित्येकांचा रोज मृत्यू होत आहे. कित्येकांनवर उपचार सुरू आहेत तर हाॅस्पिटल मध्ये बेड मिळत नसल्याने अनेकांना घरीच होमकोरोंटाईंग केले आहे. डाॅक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस इतर कर्मचारी कोरोनाचे शिकार होत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने घरी राहणे आवश्यक असल्याचे, सोशलडिस्टींग, मास्क वापरावे असे सरकार सांगत आहेत. फक्त ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ बदलापूर, टिटवाळा, उल्हासनगर या शहरांचा विचार केला तर येथे कोरोनाचा स्फोट होण्याची वेळ आली आहे. कल्याण ग्रामीण भागात तर म्हारळ वरप कांबा, खडवली, निळजे, ही गावे हाॅसस्पाॅट च्या दिशेने वाटचाल करत आहेत तरीही आज नंतर कित्येक वर्षे मटन मच्छी चिकन आणि दारु प्यायला व खायला मिळणारच नाही अशा पद्धतीने आज पहाटेपासून म्हारळ वरप कांबा, गोवेली, खडवली, पावशेपाडा, पांजरपोळ, बल्याणी, उंबार्णी, दहागाव फाटा, मोहना, अंबिवली, फळेगाव, रुंदा, जांभूळपाडा, बापसई, मांजर्ली मानिवली, आदी गावांमध्ये गर्दी होती. यातील सर्वाधिक गर्दी म्हणजे म्हारळयेथील वाईन शाॅप, म्हारळ वरप कांबा पावशेपाडा गोवेली येथील मटन चिकन मच्छी ची दुकानात होती. दुकान मालक वारंवार सोशलडिस्टींग चे पालन करा असे सांगत होता. पण ऐकतो कोण? काय करणार पोलीस? येथे सोशलडिस्टींग ची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली होती. आपली जबाबदारी काय हेच नागरिकांना व तळीरामांना माहिती नाही असे गर्दीवरून दिसत होते. येथे कोणालाही कोरोनाचे काही घेणे देणे नव्हते. आज च्या दिवशी कल्याण मुरबाड महामार्गावरील वाहनांची गर्दी व संख्या पाहता आपल्या परिसरात लाॅकडाऊण आहे यावर विश्वास ठेवणे आवघड होते. आपल्या आयुष्यात "गटारी" पुन्हा कधी येणारच नाही असे चित्र या परिसरात दिसत होते. अशाही परिस्थितीत रायते ग्रुप ग्रामपंचायत चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण गटारी अमावस्ये धामधुमीत ही चिकन मटन ची दुकान बंद ठेवून संपूर्ण कडक लाॅकडाऊण चे पालन केले. परंतु इतर महाभागांना कोण समजावणार? शीर सलामत तो पगडी पचास!
एकूणच आजचे चित्र पाह्यल्यावर एकच वाटत होते ", गटारी जोमात आणि कोरोना कोमात" पण यात फरक पडला नाही आणि आपणास वेळीच शहाणपण सुचले नाही तर चित्र उलटे असेल ते असे "आपण कोमात व कोरोना जोमात",

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...