फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना करून जातीय तेढ निर्माण करणारा पेण तर्फे तळे येथील अरोपी माणगांव पोलीसांच्या ताब्यात !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे विदृपीकरण व विटंबना करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणार्या रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे गावातील अट्टल जातीयवादी आरोपीस माणगांव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर आरोपी गेली अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर मुस्लिम तरूणांच्या नावाने फेक अकाऊंट ओपन करून त्या फेक अकाऊंट च्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव, बोधिसत्व परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे विदृपीकरण आणि जाणीवपूर्वक विटंबना करून जातीय तेढ करणार्या पोस्ट अपलोड करत होता. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशातील तमाम आंबेडकरवादी बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बहुजन समाजात संबंधित आरोपी विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
समाजातील आयटी एक्सपर्ट तरुणांनी सदर आरोपीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून डिटेल्स प्राप्त करून सदर आरोपीच्या विरोधात माणगांव पोलीस ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा महासचिव माननीय श्री. सागर भालेराव यांच्या माध्यमातून अध्यक्ष मार्गदर्शक विश्वतेज साळवी, रिपब्लिकन कामगार सेना अध्यक्ष श्री रमेश जाधव, वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुका अध्यक्ष सारथी म्हामुनकर, वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुका महासचिव रोहन साळवी, बौद्धजन पंचायत समिती माणगांव तालुका अध्यक्ष माननीय श्री रविंद्र मोरे साहेब, सचिव माननीय श्री आरडी साळवी, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सहाय्यक कुल सचिव विकास दादा गायकवाड, पत्रकार उत्तम तांबे, माजी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रायगड श्री नितीन मोरे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे सुर्यकांत कासे सर, माणगाव तालुक्यातील बौदजन पंचायत समिती शाखा क्रमांक ११ चे अध्यक्ष संतोष कासारे, भारतीय बौद्ध महासभेचे माननीय सिद्धार्थ सोनावणे, कोषाअध्यक्ष विजय जाधव, आणि विविध सामाजिक धार्मिक संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नामदेव कासारे, पराग जाधव, निलेश साळवी, अरविंद मोरे, संजय गमरे, सिद्धार्थ मोरे, अजय कासारे, रमेश घोगरे, रोहीत सकपाळ, प्रदिप जाधव, शुभांगी सोनावणे, शरद पवार इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांनी माणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उध्दव माणिक सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल करे, यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. या मध्ये सदर आरोपी बरोबर असलेल्या सह आरोपी आणि त्यांच्या मागे असलेल्या जातीयवादी समाजकंटक सुत्रधारांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्व समाजातून मागणी केली जाते आहे.
माणगांव पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये आयपीसी आयटी अॅक्ट २९५ अे ( धार्मिक भावना दुखावने ) त्याच बरोबर ६६ ( अे ) ( सी ) नुसार कारवाई केली असून संबंधित आरोपीला माणगांव पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उध्दव माणिक सुर्वे व पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल करे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री स्वप्नील कदम, पोलीस नाईक अनिल वडते,पोलीस शिपाई श्री धोंडीबा गीते करत आहेत.

No comments:
Post a Comment