Sunday, 19 July 2020

म्हारळ वरप कांबा सह दहा ते पंधरा गावे कंन्टेनमेंट झोन जाहीर 31जुलै पर्यंत लाॅकडाऊण! कल्याण प्रांताचा आदेश!

म्हारळ वरप कांबा सह दहा ते पंधरा गावे कंन्टेनमेंट झोन जाहीर 31जुलै पर्यंत लाॅकडाऊण! कल्याण प्रांताचा आदेश!


कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळून आले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुक्यातील म्हारळ वरप कांबा यासह सुमारे दहा ते पंधरा गावे ही प्रतिबंधित क्षेत्र /कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली असून या गावात 31 जुलै 2020 पर्यंत लाॅकडाऊण लागू करण्यात आला असून केवळ अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व आस्थापना व व्यवहार बंद करण्याचे आदेश कल्याण उपविभागीय अधिकारी डॉ नितीन महाजन यांनी दिले आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरात कोरोना चा भडका उडाला आहे. रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. मागील महिन्यापर्यंत कल्याण ग्रामीण भाग कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावापासून थोडासा दूर राहिला होता. पण लाॅकडाऊण मध्ये दिलेल्या शिथिलतेचा अनेकानी गैरफायदा घेतला. यांचा परिणाम म्हणून म्हारळ वरप कांबा येथे मोठय़ा प्रमाणात कोरोना कोव्हीड चे रुग्ण आढळून येऊ लागले एकट्या म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीतील कोरोना चा आकडा 200 कडे वाटचाल करीत आहे. हे गंभीर व चिंताजनक आहे.
म्हारळ, वरप, कांबा, रायते, फळेगाव, गुरवली वावेघर, निंबवली, राया, घोटसई, खोणी, दानबाव, नांदप, गोवेली, भिसोळ, आदी गावांमध्ये कोरोनोच्या विषाणू संक्रमित रुग्ण आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना विषाणूंच्या प्रचाराचे माध्यम पाहता सदर विषाणूंची लागण एका संक्रमित रुग्णांकडून अन्य व्यक्तिस /इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते त्यामुळे त्या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करने व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे या सर्व बाबींचा विचार करून ही गावे केंद्रस्थानी ठेवून खबरदारीचा उपाय म्हणून सदर रुग्णांच्या रहिवास ठिकाणापासून चा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र /कंन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने, आस्थापना 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश कल्याण चे उपविभागीय अधिकारी डॉ नितीन महाजन यांनी दिले आहेत. आता यांची किती व कशी अंमलबजावणी होते हे समोर येईलच. परंतू सुजाण नागरीकांनी संभाव्य धोका ओळखून घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कल्याण तहसीलदार दीपक आकडे व गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी केले आहे. तर पुणे सारख्या शहरात सध्याच्या परिस्थितीत एक ही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही यावरून कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढतोय हे लक्षात येतोय, त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांनो सुधारा, स्वतः ला आवरा घरी रहा सुरक्षित रहा!

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...